तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतलं सुपरहिट चित्रपट सुपर थर्टीचा मनसोक्त आनंद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
     ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नेहरू चौक तळ येथील विद्यार्थ्यांनी सध्या भारतभर चर्चेत असलेले शैक्षणिक दृष्ट्या प्रेरणादायी चित्रपट सुपर थर्टी चित्रपटाचा मनसोक्त आनंद संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जबदे व सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. परळी येथील नाथ चित्रपट गृहांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष शो ची व्यवस्था करण्यात आली होते. सत्य घटनेवर आधारीत बिहार येथील आनंदकुमार या शिक्षकाच्या जीवनावर आधारित या चित्रपटांमध्ये परिस्थितीवर मात करून गुणवत्ता व अथक परिश्रम तथा चिकाटीतून कोणतेही यश संपादन करता येते अश्या प्रेरणा देणाऱ्या घटनेवर आधारित या चित्रपटांमध्ये विविध काम करणाऱ्या मुलांना घेऊन आनंदकुमार यांनी शिक्षण क्षेत्रात मानाचे मानले जाणारे आय आय टीमध्ये सुपर थर्टी विद्यार्थ्यांचा प्रवेश करून इतिहास रचला होता. या सत्य घटनेचे चित्रीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवून हे विद्यार्थी ही परिस्थितीला दोष न देता  वर्तमान परिस्थितीवर मात करून उज्ज्वल भविष्य निर्माण करतील असं ठोस विश्वास यावेळी विद्यार्थ्यामध्ये रुजला असे दिसून आले.

No comments:

Post a comment