तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

पातुडर्यातील पाणी टाकी व वितरण व्यवस्था संदर्भात स्वातंत्र्यदिनी लाक्षणीक उपोषण तृत स्थगीतसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा येथील नागरिकांना स्वच्छ व मुबलक समान वितरण व्हावी तसेच स्थापने पासुन गावातील जिर्ण झालेली पाईप लाईन व नविन टाकी मंजुरीत देण्यास प्रशासन टाळाटाळ करित असल्याने प्रशासनाच्या निषेधार्ध माहे जुन मध्ये डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे पदस्यर्श झालेल्या ऐतिहासिक स्थळी लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई प्रकाशराव भोंगळ यांनी ग्रा प सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रशासनच्या संबंधीत विभागाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवशीय लाक्षणीय उपोषण झाले त्यावेळी याची दखल घेत जिल्हापरिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग मार्फत संपुर्ण गावाचे सर्वेक्षण करण्यात आले अस्तीत्वातील जलकुंभ गावाच्या पातळीचे पत्र ग्रा प ला ४ महिण्यापुर्वी प्राप्त झाले होते व जि प ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाने वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव वर्ग करून मार्गदर्शन माग़ितले परंतु गेल्या ४ महिण्यापासुन अदयापही मार्गदर्शन बाबत वरिष्ठ कार्यालयकडून ग्रा पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयास कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन सुचना पत्र प्राप्त झाले नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा वरिष्ठ कार्यालय कडून मार्गदर्शन प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल नविन टाकीची जागा निश्चित केली असल्यास त्या जागेचा ग्राम पंचायतच्या मालकी हक्का बाबतची कागदपत्रे उपविभागीय कार्यालयास सादर करण्याबाबत पत्र जि प ग्रा पाणी पुरवठा उपविभाग कडून पातुर्डा ग्रा प च्या लोकनियुक्त सरपंच शैलजाताई भोंगळ यांना प्राप्त झाल्याने स्वातंत्र्य दिनी लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वात जिर्ण पाईप लाईन बदलुन पाणी वितरण व्यवस्थे साठी नविन पाईपलाईन व नविन टाकी बांधकाम  होणारे लाक्षणीक उपोषण तृत स्थगीत करण्यात आले

नविन टाकी बांधकाम साठी जागा उपलब्ध

 ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग  कार्यालय कडून नविन टाकी बांधकाम साठी जागा निश्चित केली असल्यास व त्या जागेचा ग्राम पंचायत मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर करण्याचे सुचना पत्र ग्रा प ला प्राप्त होताच ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयास ग्रा प ने उपरोकत सुचने नुसार संबंधीत कागदपत्रे सादर करण्यात आले आता कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरठा  वरिष्ठ कार्यालय तील संबंधीत अधिकारी यांनी जातीने लक्ष दयावे अशी मांगणी जोर धरत आहे पातुर्डा गावातील लवकर जिर्ण पाईप लाईन व नविन टाकी  कामास मंजुरी देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच श्रीमती भोंगळ यांनी  संबंधीत विभागाला दिला आहे

No comments:

Post a comment