तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

परळीकरांनी मोठ्या प्रमाणावर केली कोल्हापूर, सातारा, सांगली येथील पुरग्रस्तासाठी मदत एक दिलासा फांऊंडेशन व सुर्या प्रतिष्ठान चा उपक्रम सोमवारी दोन ट्रक जिवनावश्यक साहित्य केले रवानापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
           सुर्या प्रतिष्ठान व एक दिलासा फांऊंडेशन च्यावतीने सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांंना मदत करण्यासाठी मदत केंद्र राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकातील गुरुकृपा पानसेंटर जवळ उभारण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मदतीचा हात दिला .
             मागील सात दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूर यासह इतर ठिकाणी अतिवृष्टी मुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरग्रस्त नागरिकांना विविध प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येत आहे. या मदतीमध्ये परळीकरही आघाडीवर आहेत. रविवारी (ता.११) राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकात सर्या प्रतिष्ठान व एक दिलासा फांऊंडेशन च्यावतीने पँन्डाँल उभारून मदत संकलन केंद्र उभारण्यात आले होते. सकाळी १०.०० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळे, महिला भजनी मंडळ, प्रतिष्ठान, नागरिक, महिला लहानमुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींनी विविध वस्तू मिनरल वाँटरचे बाँक्स, बिस्किटे, कपडे, जेवणाचे साहित्य, पत्रवाळी अशा जिवनावश्यक वस्तू  परळीकरांनी या संकलन केंद्रात जमा केल्या व पुरग्रस्तासाठी आपली संवेदना व्यक्त केली. जवळपास दोन ट्रक साहित्य यावेळी जमा करण्यात आले. अनेक सामाजिक संस्थांनी, युवकांनी आपापल्या गल्लीत जमा करून मोठ्या अँटोने हे साहित्य या केंद्रात जमा केले. यावेळी सुर्या प्रतिष्ठान व एक दिलासा फांऊंडेशन चे युवक कार्यकर्ते यांनी मोठे परिश्रम घेतले. हे दोन ट्रक साहित्य घेऊन सोमवारी (ता.१२) हे युवक कार्यकर्ते पुरग्रस्त भागात जावून स्वतः वाटप करणार आहेत.

No comments:

Post a comment