तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

भीक म्हणून कर्ज माफी मागत नसून शेतकरी बापाच्या लुटीचा परतावा म्हणून कर्जमाफी मागतोय - अजित नवले
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
भिक म्हणून कर्ज माफी मागत नसून बापाच्या लुटीचा परतावा म्हणून कर्ज माफी मागतोय अशी भूमिका महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित राव नवले यांनी मांडली आहे.
 ते परळी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शेतकरी संघर्ष मेळाव्यात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले देशांमध्ये व महाराष्ट्रामध्ये ाजपचे सरकार आल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .देशांमध्ये धर्मांध व जातीच्या मुद्द्यावर लोकांना भडकुण शेतकऱ्यांच्या हमीभाव स्वामीनाथन आयोग संपूर्ण कर्जमाफी युवकांची बेरोजगारी शिक्षण या मूलभूत गरजांपासून व त्यांच्या मागण्या पासून लांब ठेवण्यासाठी सरकार जाणून बुजून धर्मांध व जातीचे मुद्दे पुढे आणतआहेत भाजप सरकार स्वतः सरकार चालवण्यापेक्षा आरएसएस च्या मनावर व त्यांच्या दिशेवर सरकार चालत असल्याचा आरोपही नवले यांनी केला आहे.
 सरकार जर शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर संवेदन होत नसेल तर किसान सभा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याच्या सभा उधळून लावण्याचा इशाराही नवले यांनी दिला आहे.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते उत्तम माने हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षक नेते पीएस घाडगे, अजय बुरांडे, भाऊसाहेब झिरपे ,दिपक लीपणे ,मोहन लांब,  देवराव लुगडे,मुरलीधर नागरगोजे, अनुरथ गायकवाड हे होते पुढे बोलताना नवले म्हणाले देशामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी शेतकरी चळवळीत येऊन बापाच्या कर्जमाफीसाठी तीव्र लढा उभारला पाहिजे.
 देशाच्या अर्थमंत्री यांनी शेतकरी हिताचे कोणतेही ठोस नियोजन न करता झिरो बजेट शेती सारखा फार्मूला त्या मांडत आहेत पण त्यामागे सरकारचं वेगळच षड्यंत्र असल्याचा आरोपी नवले यांनी केला आहे . या कार्यक्रमासाठी तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होतेशहरातील शिवाजी चौकातून निर्धार रॅली काढून त्याचा समारोप नटराज रंग मंदिरात करण्यात आला .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल माने,अमोल वाघमारे, विशाल देशमुख, विष्णुपंत देशमुख ,ज्ञानेश्वर देशमुख, महादेव शेरकर ,भगवान बडे, विष्णूपंत देशमुख, अनिल माने, रुस्तम माने, अमोल वाघमारे, विशाल देशमुख, राम भोरकडे, तुकाराम कदम, महादेव शेरकर, प्रकाश उजगरे,   मच्छिंद्र , काळे, रामभाऊ राडकर,यूवराज खटके, राजेभाऊ प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment