तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

पाथरीतभीक मागत उदरनिर्वाह करणा-याची श्रीमंती;पुरग्रस्तांना केली दोन हजारांची मदत;सढळ हाताने मदत करण्याचे केले आवाहन


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-ज्या माणसां मुळे माझा आणि माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो आज तीच माणसं संकटात असतांना मी त्यांना मदत करणे माझे कर्तव्य समजतो असे म्हणत दोन्ही पायांनी अपाहीच असलेले विठ्ठल नगरातील शेख रोशन शेख उमर हे सायकल रिक्शातुन पाथरी शहरात एक-दोन रुपये भिक मागून आपला  उदर निर्वाह करणा-या या अवलियाची दानत पाहून मदत मागणारे ही आवाक झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेख रोशन यांच्या श्रिमंतीला सलाम करत त्यांचा सत्कार केला.
सांगली,कोल्हापूर,क-हाड  भागात कृष्णा,वारणा आणि पंचगंगे मुळे या दोन्ही जिल्ह्यात पुराच्या पाण्या मुळे हाहाकार उडाला असून लाखो लोक बेघर झाल्याने या लोकांना मदत देण्या साठी मंगळवार १३ ऑगष्ट रोजी पाथरी शहरातून मदत फेरी काढण्यात आली.श्रीराम मंदिरा पासून सुरू झालेल्या मदत फेरीत शहरातील नामवंत मंडळी सहभागी झाली होती.या वेळी धान्या सह रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून देण्या साठी अनेक हात पुढे येतांना दिसत होते.एका ठिकाणी कुटूंबाचा उदर निर्वाहा साठी गवताचे गाठोडे घेऊन बसलेली म्हातारी आई पुढे सरसावली आहे काही रुपयांची मदत तीने या मदत पेटीत टाकली शहरातील लहान,लहान व्यवसाईक मदती साठी पुढे येतांना दिसले.तर माता भगीनींनी धान्याच्या स्वरुपात मदत देत होत्या.पाथरी तालुक्याच्या ग्रामिण भागात ही दुष्काळअसतांना नागरीक पुढे येत असून गावांगावात धान्य आणि रोख रकमा जमा करत आहेत ही सर्व मदत धान्याच्या रुपात थेट पुरग्रस्त भागात स्वयंसेवकां सह पोहचवणार असल्याचे मदत फेरीतील पाथरीकरांनी सांगितले.

No comments:

Post a comment