तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

संवेदना राष्ट्रवादीची.. माणुसकी परळीकरांची : पुरग्रस्त मदतफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद !परळीकरांकडून पाच लाख रु. अर्थिक निधी सह औषधे व धान्याची मदत

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वानी पुढे येण्याची गरज लक्षात घेऊन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शहरात मदतफेरी काढण्यात आली. या पुरग्रस्त मदतफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिक, व्यापारी यांनी मोठे योगदान दिले. या मध्ये पाच लाख रु. निधी सह औषधे व धान्याची मदत पुरग्रस्त भागासाठी करण्यात येणार आहे. संवेदना राष्ट्रवादीची.. माणुसकी परळीकरांची या भावनेतून ही भरघोस मदत होत आहे.
     अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे.यासाठी  शनिवार दि. 10  रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परळी शहरात मदत फेरी काढण्यात आली. या मदतफेरीत संवेदनशील परळीकरांनी आपला सहभाग नोंदवत पुरग्रस्त निधीसाठी मदतीचा हात पुढे केला. परळीच्या व्यापारपेठेतील व्यापारी, छोटे -मोठे व्यावसायिक, संस्था व  नागरीकांनी पुढे येत मदत केली.  
       राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या पुरग्रस्त मदतफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मध्ये मोठा अर्थिक निधी जमा झाला आहे. या अर्थिक निधीत आणखी निधी जमा करून पाच लाख रुपये निधी पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे औषधे व  धान्य या स्वरुपातही परळीकरांच्या वतीने  पुरग्रस्तांसाठी मदत केली जाणार आहे. अर्थिक मदत निधी व अन्य मदत साहित्य ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे कुशल प्रशासक म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्याकडे  सुपूर्द केले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या  आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल तमाम परळीकर नागरिकांचे त्यांनी आभार मानले आहेत. 
    सुरुवातीस पुर परिस्थितीत  जीव गमवावा लागलेल्या पूरग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मदतफेरीत बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी,अय्युब पठाण,सुरेश टाक, शरद मुंडे,प्रा.डॉ.विनोद जगतकर, गोपाळ आंधळे, संजय फड,अनवर मिस्किन,शेख शरीफ, महादेव रोडे,राजेंद्र सोनी,जयप्रकाश लड्डा, अनंत ईंगळे, अझिज कच्छी,शंकर आडेपवार, अजय जोशी,सुरेश नानावटे, लाला पठाण,रवी मुळे, सचिन जोशी,जितेंद्र नव्हाडे, अल्ताफ पठाण, गफार काकर,शशी बिराजदार, बळीराम नागरगोजे,के.डी. उपाडे, श्रीहरी कवडेकर, बालाजी वाघ,ओम मुंदडा, एस.एन. सावजी, प्रा. शामसुंदर दासूद,भारत ताटे,तक्की खान,राज जगतकर, चंद्रप्रकाश हालगे,प्रशांत कोपरे,शरद चव्हाण,बबलू साळवे, सय्यद फेरोज,शाम कुकर, बाबा सरवदे आदीं सह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   आणखी दोन दिवस मदतसंकलन. ....सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन!
     दरम्यान  आणखी दोन दिवस मदतसंकलन करण्यात येणार आहे. या मध्ये  अर्थिक  निधी,अन्न धान्य,औषधसंकलन करण्यात येणार आहे. या मध्ये सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपली मदत जमा करण्यासाठी बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी,शंकर आडेपवार, यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment