तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील वादळाला भावपुर्ण निरोप


धम्मानंद मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार;मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेते,रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांचे रविवार दि.11आॕगष्ट रोजी -हदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.सोमवारी भिमनगर येथील शांतीवन स्मशान भुमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बहुजन चळवळीतील एक वादळ शमले अशा शोकभावना फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील नेते,विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते धम्मानंद मुंडे यांच्या सोबत सहवास लाभलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या.
काल दि.11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा.धम्मानंद मुंडे यांच्या दुःखद निधनाची बातमी संपुर्ण महाराष्ट्रात वा-यासारखी पोहचली आणी नेते कार्यकर्ते परळीच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होती. परळी शहरातील भिमवाडी येथील त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनाठी काल पासुन मोठी गर्दी झाली होती. परळी शहरातील व्यापाऱ्यानी आपल्या बाजार पेठेतील व्यापर बंद ठेऊन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.सोमवारी सकाळी 11वाजता भिमवाडी येथुन त्यांची अंत्ययाञा शांतीवण स्मशानभुमीच्या दिशेने काढण्यात आली तेव्हा संपुर्ण परळी शहर व महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन आले धम्मानंद मुंडे प्रेमी या अंत्ययाञेत सहभागी झाले होते. 1 वाजण्याच्या सुमारास बौध्द पध्दनीने त्यांच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी श्रध्दांजली अर्पण करताना भदंत नागसेन बोधी, शिवसंग्रामचे नेते आ.विनायक मेटे,माजीमंञी पंडितराव दौंड,प्रा.टि.पी.मुंडे,फुलचंद कराड,काॕ,पि.एस घाडगे,पप्पु कागदे धम्मानंद मुंडे यांचे बहुजन चळवळीतील योगदान व त्यांच्यासोबत सामाजीक राजकिय क्षेत्रात काम करत असलेल्या आठवणी व्यक्त करत भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.या शोकसभेत चंद्रकांत चिकटे,बाबासाहेब कांबळे,डॉ सिध्दार्थ भालेराव,दयानंद स्वामी,अजय मुंडे,भास्कर रोडे,एन.के.सरवदे,विजय साळवे,गंगाधर रोडे,दत्ताप्पा इटके,कचरु खळगे,प्रशांत शेगावकर,अतुल दुबे,दिलीप जोशी,प्रा,रविंद्र जोशी,ज्ञानोबा कांबळे,अशोक साळवे,व्हि.बी.जाधव, प्रा.दासु वाघमारे,अशोक साळवे,श्रीकांत पाथरकर,श्रीकांत बनसोडे,अशोक ताटे,वैजनाथ सोळंके,,द्वारकाताई कांबळे,विजय साळवे, आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अनेक नेते कार्यकर्ते,व्यापारी,पञकार,वकील,शिक्षक,औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी कर्मचारी,एस.टी.महामंडळाचे अधिकारी वर्ग आणी फुले-शाहु-आंबेडकर चळवळीतील समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
——————
आज राख सावडण्याचा कार्यक्रम
——————
कालवश धम्मानंद मुंडे यांचा रक्षाविधी (राख सावडण्याचा) कार्यक्रम मंगळवार दि.13 आॕगष्ट 2019 रोजी सकाळी 7-30वाजता होईल असे शोकाकुळ मुंडे परिवाराच्या वतिने कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment