तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

शहिद जवानाच्या विरपत्नीच्या उपस्थित राहाता तहसील कार्यालासमोर प्रशासकीय ध्वजारोहणविरपत्नीला प्रशासकीय अधिकाऱ्याकडून सन्मानित

सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
दिनांक १२ आॅगस्ट २०१९ रोजी राहाता तालुक्यातील राजुरी येथील शहिद जवान आनिल विष्णुपंत गोरे यांच्या विरपत्नीच्या उपस्थितीत राहाता तहसील कार्यालयासमोरील प्रशासकीय ध्वजारोहण होण्याकरिता निवेदनाद्वारे तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते श्रीकांत मापारी, साहेबराव कुदळे ता.संभाजी ब्रिगेड, बाबासाहेब औटी, संदिप जेजुरकर, दिनकर शेळके, वसंत शेळके, पोपट शेळके, दत्तु साखरे, पंढरीनाथ घाडगे, आदी संघटना च्या मागणीची प्रशासनाकडुन घेतली दखल

स्वतंत्रदिनाचा प्रशासकीय  ध्वजारोहण निवेदनाप्रमाणे विरपत्नी तेजस्विनी अनिल गोरे यांच्या उपस्थितीत करुन या मागणीचा प्रशासनाने आदर केला.

 राजुरी येथील जवान अनिल विष्णुपंत गोरे जम्मू मधील लड्डाक या ठिकाणी काही दिवसापुर्वी आपले कर्तव्य बजवत असताना शहीद झाले आहे.

जवान अनिल विष्णुपंत गोरे यांनी देशासाठी दिलेले बलिदान या शिर्डी विधानसभा मतदारसंघात अविस्मरणीय आहे.

तालुक्याचे विरपुत्र शहिद जवान आनिल गोरे यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा सन्मान  म्हणून विर जवान यांच्या धर्मपत्नीच्या उपस्थितीत राहाता तहसील कार्यालयासमोरील प्रशासकीय ध्वजारोहण केले.

 राहाता तालुक्यातील सर्व  नागरिकांच्या भावनेचा आदर केल्याने उपविभागीय अधिकारी शिर्डी श्री गोविंद शिंदे साहेब, तसेज राहाता तहसीलदार श्री मानिकराव आहेर व त्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे समाजिक संघटनेच्या वतीने आभार व्यक्त होत आहे.

No comments:

Post a comment