तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

वाशिम जिल्ह्यात २० ठिकाणी आधार केंद्र सुरु;मंगरुळपीर तालुक्यात ५ केंद्रफुलचंद भगत
वाशिम : वाशिम जिल्ह्यात २० ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी गुरूवारी केले.
नवीन आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास, मोबाईल क्रमांक अपडेट करणे, पत्ता अपडेट करणे, नावात बदल करणे तसेच ई-मेल अपडेट करणे या सारख्या सुविधा शासकीय नियमानुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 
1) वाशिम तालुक्यात मनोज मालस लाखाळा वाशिम, विभा मुसळे पार्डी आसरा, सुरज ठाकरे वारला अशा  ३ ठिकाणी ही सुविधा आहे. 
2) मालेगाव तालुक्यातील सदाशिव निंभाजी जाधव वसारी आणि सुशील राजकिशोर जैस्वाल  अमाना अशा २ ठिकाणी  
3) रिसोड तालुक्यात अनिल पाटील रिसोड, 
4) मंगरुळपीर तालुक्यात नितीन गावंडे मोहरी, ईफत्कार रशीद बसस्टेशन जवळ आसेगाव,        प्रभाकर भेंडारकर धानोरा खु., सुनिल बबनस्वामी आपरुपकर शेलुबाजार, सागर महिसने तºहाळा येथे आधार नोंदणी सुविधा आहे. 
5) मानोरा तालुक्यात मानसिंग नानु राठोड फुलउमरी, आशिष रमेश चानेकर दापुरा,                    मनिष पवार कोंडाळी, विष्णु हरसुळे पोहरादेवी, प्रविण गावंडे तहसिल कार्यालय मानोरा,               अमोल योगेश्वर घोडे दापुरा, रविंद्रा दिगांबर ठाकरे ग्राम पंचायत कार्यालय, कुपटा  
6) कारंजा येथे निलेश घाटे धामणीखेडी येथे आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. आधार नोंदणीकरीता ओळखीचा पुरावा, रहिवाशी दाखला व जन्मतारखेचा पुरावा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment