तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

मुंबईत रक्षाबंधन सण मोठ्या उत्सवात साजरा


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : फुलो का तारो का सबका कहेना एक हजोरो मै मेरी बहेना है.
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया
रक्षाबंधन "राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.बहिण-भावाचे नात्याचे महत्व अधोरेखीत करणारा रक्षाबंधन सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सात ते आठ दिवस अगोदर राखीनी बाजारपेठा सज्ज झाल्या होत्या. या वर्षी मोठ्या प्रमाणात राखी विक्री झाली.
घरोघरी बहिणींनी भावाला राखी बांधून, पेढा भरवत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
सणाची आरास घेऊन येणारा श्रावण सर्वाना हवाहवासा वाटतो. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात.लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते.
व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली,
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची अाठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
 राखी विषयी इतिहास
ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले.

No comments:

Post a comment