तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

उत्तम मुंडे यांना राजवैद्य सोशल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय सर्वश्रेष्ठ सेवागौरव पुरस्कार जाहीर!संगणक परिचालक संघटने कडून सत्कार संपन्न !

परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- परळी पंचायत समिती अंतर्गत कनिष्ट सहाय्यक पदावर कार्यरत असलेले उत्तम बाबुराव मुंडे यांच्या सेवेची व कार्याची दखल घेऊन राज वैद्य सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र यांनी सर्वश्रेष्ठ सेवागौरव पुरस्कार जाहीर केला आहे.  त्याबद्दल महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

      याबाबत सविस्तर वृत्त की परळी पंचायत समिती येथे कार्यरत असलेले कनिष्ट सहाय्यक उत्तम बाबुराव मुंडे यांच्या प्रामाणिक कार्याची तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली राजवैद्य सोशल फाउंडेशन,महाराष्ट्र यांनी सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरीय सर्वश्रेष्ठ गौरव पुरस्कार जाहीर केला असून हा पुरस्कार मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि १७ ऑगस्ट २०१९ रोजी  औरंगाबाद येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने उत्तम मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, तसेच माजी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त ग्रामसेवक ज्ञानोबा महादेव होळंबे,  नरहरी मुंडे, ग्रामसेवक अशोक नागरगोजे यांच्यासह नारायण गित्ते, धोंडीराम बांगर, वैजनाथ माने, जयदत्त नरवटे, बळीराम नागरगोजे, दत्ता मुंडे, ज्ञानेश्वर होळंबे, विजय गित्ते,संदीप दिवटे, नवनाथ पारवे, सोमनाथ कांगने, भागवत डापकार यांच्यासह संगणक परिचालक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment