तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 August 2019

पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा

तेल्हारा : पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने येथील भागवत मंगल कार्यालयात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने येथील सौ डॉ मोनिका तराळे व गिरीश कोळपे सर यांच्या वतीने शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली. या वेळी विद्यार्थ्यांना जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
       गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे डॉ सौ मोनिका तराळे यांच्या हस्ते करण्यात आले. खामगाव येथील एक सहयोग ग्रामीण आणि शहरी विकास संस्थेचे डॉ महेंद्र मोरखडे, ऍड सौरभ जयस्वाल, प्रा नितीन सोनी यांनी शाडू मातीपासून मूर्ती कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. सौरभ जयस्वाल यांनी शाडू मातीचे महत्त्व पटवून दिले. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून प्रदूषण कसे होते हे पटवून दिले. मुलांसोबत आलेल्या पालकांनी सुद्धा मूर्ती तयार केल्या. तसेच वसुंधरा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे उदघाटन करून डॉ मोनिका तराळे यांनी गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होत असल्याने हा उत्सव पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल नांदोकार तर आभार गिरीश कोरपे सर यांनी मानले.

No comments:

Post a comment