तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

वंदे मातरमच्या गाव तिथे शाखा उघडणार-दिलीपभाऊ जोशीवंदे मातरम सेनेच्या परळी व केज तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
वंदे मातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपभाऊ जोशी यांनी परळी तालुकाध्यक्षपदी गोवर्धन रघुनाथ मुंडे तर केजच्या तालुकाध्यक्षपदी अच्युत सोनाजीराव ढाकणे यांची निवड केली आहे. नुकतीच परळी येथे वंदेमातरम सेनेच्या झालेल्या व्यापक बैठकीत सदरील निवड जाहीर करण्यात आली आहे. 
वंदे मातरम सेनेचे बीड जिल्ह्याची विस्तारीत बैठक परळी येथे गुरूवार दि.8 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. बैठकीस वंदेमातरम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपभाऊ जोशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष बालासाहेब गित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीपभाऊ जोशी यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वंदे मातरम सेनेच्या संपूर्ण राज्यभर गाव तेथे शाखा उघडण्यात येत आहेत. संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट कार्यकर्त्यांनी साध्य केले पाहिजे. वंदेमातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष कै.अशोकभाऊ जोशी यंाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. तसेच राष्ट्रीयत्वाची भावना जोपासावी, प्रशासकिय स्तरावर चालू असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवावा असे आवाहन दिलीपभाऊ जोशी यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी परळी तालुकाध्यक्षपदी कन्हेरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी गोवर्धन रघुनाथराव मुंडे यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत केज तालुकाध्यक्षपदी सारोळा येथील माजी सैनिक अच्युत सोनाजीराव ढाकणे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष बालासाहेब गित्ते यांनीही मार्गदर्शन केले. 
यावेळी वंदेमातरम सेनेचे हेमंतराव कुलकर्णी, उद्धव कराड, राजाभाऊ धस, सचिन गित्ते, फुलचंद गित्ते, गणेश कांदे, शिवाजी आघाव, मधुकर पाटील, संकेत आघाव, सुधाकर मुंडे, रामेश्वर मुंडे, शंकरराव इंदुरकर, व्यंकटराव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही नवनियुक्त तालुकाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a comment