तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

रमाबाई आंबेडकर प्रा.शाळा नागापुर येथे ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

     सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळा नागापूर येथे 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेश देशमुख रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळेच्या संस्थेचे सचिव गणपत बनसोडे श्रीहरी मुंडे शाळेचे मुख्याध्यापक शिर्के सर आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळाचे सुनंदा बनसोडे, नीता कानडे, ज्ञानोबा डिगोळे, साईनाथ बनसोडे, राजाभाऊ भुसे,शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment