तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

निवासी उपजिल्हाधिकारी यांना इच्छा मरणाचे निवेदन देत लातुरात विनाअनुदानित शाळा शिक्षक आक्रमक


लातुर (प्रतिनिधी) :- दिनांक १२/०९/२०१९ रोजी लातुर येथे सुरु असलेल्या विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या अंदोलनाचा आठवा दिवस आहे. शासण दरबारी अनुदानाचा निर्णय घेण्यासाठी होत असलेली दिरंगाई पाहता आज अंदोलनकर्ते सर्व शिक्षकांनी लातुर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाला स्वेच्छा मरण पत्कारणार असल्याचे कळवीले आहे.आणि त्यासाठी महाराष्ट्र शासणाने परवानगी द्यावी असेही म्हणण्यात आले आहे.


मागील अधिवेशनात नवनियुक्त शिक्षणमंत्री यांनी सभागृहात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की सर्व कायम विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये यांना त्यांना प्रचलित  नियमानुसार देय्य असलेला अनुदानाचा टप्पा अधिवेशन संपल्यानंतर उपसमिती गठीत करुन देण्यात येईल.पण सदरिल उपसमितीची बैठक ही ०८ जुलै ला होवून आता एक महिना उलठला आहे,लवकरच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार आहे.तरीही शासणाने याबाबतीत निर्णय घेऊन आदेश पारीत केलेला नाही.म्हणूनच निराशेत हरवलेल्या अनेक शिक्षकांचे ह्दय विकाराने निधन झाले आहे.नुकतेच ०४ आॕगस्ट रोजी लातुर येथील सेंट मेरी शाळेचे सखाराम  सुरवसे सर यांचे ह्दय विकाराने निधन झाले .आता शिक्षकांचा संयम संपला असून येणाऱ्या कॕबीनेटला शासणाने आदेश न काढल्यास महाराष्ट्रभर सुरु असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनी स्वेच्छा मरण स्विकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.तशी परवानगीच थेट मुख्यमंत्री यांना मागितली आहे.

या निवेदनावर दिनकर निकम  वैजनाथ चाटे , बिबिषण रोडगे , रविंद्र तम्मेवार , जितेंद्र डोंगरे , सुरेखा शिंदे  मुक्ता मोटे , संभाजी काळे , लष्मण जगताप , नारायण खैरे , हरि मोहिते , सुदर्शन कांगणे , प्रतिभा अरसुळ , सुनिता ढोबळे , आशा बागल , विजय मुंडे , गायकवाड एस.एस. महेंद्र वाघमारे.यांच्यासह शेकडो  सह्या आहेत.

No comments:

Post a comment