तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

पालम तहसील समोर तालुक्यातील ग्रामसेवकाचे एक दिवसीय धरणे आंदोलण


आरूणा शर्मा
पालम :- तहसिल कार्यालया समोर दिनांक 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा पालम जि. परभणी ग्रामसेवक संर्वगाच्य प्रलंबीत न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्रलंबीत मागण्या वेतन त्रुटी दुर करणे, सन 2005 नंतर सेवेत आलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेंशन योजना लागु करणे, प्रवास भत्ता सुधारणा करणे, ग्रामसेवक पदाची शैक्षणीक अहर्ता वाढवणे, ग्रामविकास अधिकारी पदे वाढवीने, आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी एक आगाऊ वेतन वाढ पुर्ववत सुरु करणे, इतर विभागाकडून लादली जाणारी अतिरीक्त कामे बंद करणे आशा विविध मागण्यासाठी पालम तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक तालुका अध्यक्ष केशव खाडे, सचिव गजानन शेवटे, उपाध्यक्ष सिंधु किर्तनकार, संजविनी सुर्यवंशी, रेश्मा चव्हण, विश्वनाथ पवार, अजित तांदळे, सुनिल एंरडे, विनोद नागरे, आकाश सोनाळे, अंकुश निलेवाड, माधव जाकापुरे, सुदाम गबाळे, सिताराम जाधव, साबने, काकडे, भालेराव, डोणे, चिल्लगर, हिगे, कंठेकर, शिंदे, घनवटे व गायकवाड या सह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment