तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

गेवराई येथे तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम नुकताच जाहीर
सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि ९ _ आजवरच्या शालेय तालुका क्रीडा स्पर्धैत एकही तक्रार निवारण करण्याची संधी मिळाली नाही, याचा अर्थ येथील स्पर्धा पारदर्शक, नियोजनपूर्वक घेण्यात आल्या. आनंद मसरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या, ही अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्वार बीड जि.प. उपशिक्षणाधिकारी बी. एस. सोनवणे यांनी गेवराई येथे काढले.
        गेवराई तालुक्यातील क्रीडा शिक्षकाची वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी आनंद मसरे हे होते. विशेष उपस्थिती उपशिक्षण अधिकारी बी.एस .सोनवणे , उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, ज्ञानदेव काशिद, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पा खाडे यांची होती. गटशिक्षण अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने आनंद मसरे यांना ऱ्हदयपूर्वक निरोप देण्यात आला. यानंतर तालुका क्रीडा स्पर्धैचे संयोजक प्रा. राजेंद्र बरकसे यांनी प्रास्ताविक करून क्रीडा स्पर्धेविषयी साधक -बाधक चर्चा करून नियोजन करण्यात आले.
       १३ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान १० खेळांच्या तालुका क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले. आभार जेष्ठ क्रीड़ा शिक्षक देविदास गिरी यांनी मानले. या बैठकीस राष्ट्रीय खेळाडू डॉ केतन गायकवाड, मयूर मोटे, विजय अपसिंगेकर, विजय जाहेर, विलास घोरतळे, पिसाळ, सुनिता पवार यांच्यासह तालुक्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक, अतिथी निदेशक, क्रीडा प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment