तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 30 August 2019

विकासकन्येने केला वैद्यनाथाच्या चरणी विकासाचा महा अभिषेक

तीर्थक्षेत्र आराखड्यातून बदलणार परळीचे रूप - ना. पंकजाताई मुंडे

विकासात अडथळा आणणारांना थारा देऊ नका - खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

१३३ कोटीच्या तीर्थक्षेत्र विकासाचा, २० कोटीच्या अंतर्गत रस्ता कामांचे थाटात भूमिपूजन

परळी दि. २९ ----- १३३ कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून देवस्थान परिसराचा विकास तर होणारच आहे, त्याचबरोबर परळी शहराचे रूप देखील पालटणार आहे. मला काय मिळेल ते मला माहित नाही परंतु मला जे मिळेल त्याच्या हजारपट परळीसाठी देईल असे सांगून माझ्या माणसाचे भले व्हावे, त्यांना विकास मिळावा यासाठीच माझी तळमळ आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज वैद्यनाथाच्या विकासाचा 'मॅप' जनतेसमोर ठेवला. 

    वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या आराखड्याच्या कामाचा तसेच विशेष रस्ता अनुदानातून मंजूर झालेल्या २० कोटीच्या अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आ. भीमराव धोंडे, आ.सुरेश धस, आ.आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार केशवराव आंधळे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. 

 पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ ते  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पर्यंत त्यांच्या कार्याचा वारसा व आदर्श माझ्यासमोर असून यांच्या प्रेरणेतून लोकांच्या विकासासाठी काम करताना माणसांची सेवा हीच देवाची सेवा मानून काम करीत आहे. आराखड्याच्या माध्यमातून होणारा देवस्थान व शहराचा  पूर्ण विकास पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांना समर्पित करताना या देवस्थानासाठी लोकनेते मुंडे साहेबांनी   उपमुख्यमंत्री असताना साडेतीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केला होता या गोष्टींचे आदर्श माझ्यासमोर आहेत.विकासाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा मराठवाड्याचा आणि राज्याची वाटचाल प्रगतीकडे नेण्यासाठी हा प्रयत्न आहे.
परळीच्या व जिल्ह्याच्या विकासामध्ये अनेक कामांद्वारे थेट त्यांच्यापर्यंत निधी नेऊन विकास घडवीत आहे यामध्ये पाणीपुरवठा योजना असतील, मराठवाडा दुष्काळ रोखण्यासाठी करायच्या उपाय योजना असतील, खडका बंधा-यात पाणी सोडण्याचे विषय असतील त्यासाठी मी पुढाकार घेतला. 

तीर्थक्षेत्राचे रूप बदलणार
-----------------
परळी वैजनाथ मंदिर विकास आराखड्यातून मंदिर परिसराचे पुरातन व धार्मिक रूप पुन्हा निर्माण केले जाईल यासाठी आवश्यक बदल येथे केले जातील यामध्ये भक्तनिवास निर्माण करताना दोनशे खोल्यांचे दोन भक्त निवास यातून ७०० भक्तांची सोय केली जाईल
याच बरोबर मंदिराच्या मागील मेरू पर्वतावर भव्य त्रिशूळ उभारून लेझर शो वारे शिवजन्माची माहिती प्रदर्शित करणे यासाठी थ्रीडी व लेसर तंत्रज्ञानाचा वापर करणे, उद्यानाचा विकास करणे या माध्यमातून भाविक येथे येण्यासाठी व राहण्यासाठी प्रोत्साहित होतील.या महत्त्वाच्या कामाबरोबरच शहराच्या चारी दिशांना कमानी उभारून शहराच्या विकासात भर टाकली जाईल तसेच शनी मंदिर, गणेश मंदिर यांचा देखील विकास घडवून आणला जाईल परळी वैजनाथ देवस्थान विकास आराखड्याच्या १३३ कोटी ५८ लक्ष रुपयांचा आराखडा याबरोबरच शहर विकासासाठी २० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देखील उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या. 

अगोदर स्वतःचा पक्ष सांभाळा

बारामतीची मंडळी इकडे येऊन भाषणं ठोकतात, मी देशाच्या नकाशातून ज्योर्तिलिंगाचे नांव काढल्याचा आरोप करतात, असे खोटे आरोप करण्यापेक्षा अगोदर स्वतःचा पक्ष सांभाळा अशी टीका ना. पंकजाताई मुंडे यांनी केली. पाणी पुरवठा योजना असो की नगरोत्थान योजना मी मंजूर करून आणली आणि त्यांनी खाल्ली त्यामुळेच तीर्थक्षेत्राचा निधी त्यांच्या हातात दिला नाही कारण मला परळीच्या नागरिकांना न्याय द्यायचाय, त्यांचे कल्याण करायचेय. गटाराचे काम निकृष्ट करणारे, धरणात लघुशंका करण्याची भाषा करणारे नेतृत्वाच्या मागे आपण राहणार का? असा सवाल त्यांनी केला. लोकल नेते लोकल निवडणूकाच जिंकतात, असा टोलाही त्यांनी लगावला. 

विकासात अडथळा आणणा-यांना दूर ठेवा - खा. डॉ. प्रितमताई मुंडे
------------------------ 
यावेळी बोलताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी विकासकामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. प्रत्येक विकास कामात अडथळा आणण्याची त्यांची वृत्ती आहे. आपण दुष्ट प्रवृत्तींना आपल्या जवळही 

No comments:

Post a comment