तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

परमार्थांत वर वर दिखावा टिकत नसतो - महंत रामगिरी
तळवाडे येथील 172 व्या अखंड हरिनाम सप्ताहात प्रतिपादन....

*गोरख पवार वैजापूर औरंगाबाद*


भक्ती आणि परमार्थात  वरवर दिखावा टिकत नसतो, दररोज किती सांप्रदाय भुछत्रासारखे उगवत असतात.परमार्थात तातडी चालत नाही गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाची 172 वर्षाची परंपरा आहे, चंद्र सूर्य असे पर्यन्त ही परंपरा सुरू राहील असे प्रतिपादन आज एकादशी च्या दिवशी झालेल्या किर्तनात महंत राम गिरी यांनी केले. गेली 6 दिवस चिखलात बसून प्रवचन श्रवण करणाऱ्या भाविकांचे कौतुक केले.हरिनाम सप्तहासाठी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत सप्तहाचे अध्यक्ष उद्योजक विष्णू भागवत यांनी दिल्याचे सांगितले. येवला पंचायत समिती चे उपसभापती यांनी एकादशीची पंगत आणि प्रचार प्रसार यासाठी 50 लाख रुपये दिल्याचे महंत रामगिरी महाराज यांनी व्यासपीठावरून जाहीर केले.भागवत बंधू  सप्ताह तळवाडे येथे घेणे शक्य झाल्याचे ही महंत म्हणाले. कापसे पैठणी चे बाळकृष्ण कापसे यांच्याही योगदानाचा  महंत रामगिरी यांनी व्यासपीठावरून उल्लेख केला.

भक्ति कठीण सूळावरील पोळी आहे, भक्ती करणारा शूर वीर विरळ च असतो, सर्वसाधारण लोक ज्याला भक्ति त्या बुवाबाजी  दाखवायचा पर्वत  आणि पायाशिवाय उभारलेली भिंत आहे.खर्‍या भक्तिचे वर्म न जाणता केलेली भक्ति ही फक्त दिखाऊ असते.
स्वयंपाक किती लक्षपूर्वक काळजी घेऊन करावा लागतो तेव्हा कुठे त्या पदार्थाला चव येते, जेवणारा संतुष्ट होतो.
ज्याचा मनावर पूर्ण अंकुश असतो तोच भक्त ,  त्याला प्रत्येक दिवस नवा म्हणजेच जागृतीचा असतो, जो अतिशय सजगपणे, सावधपणे साधना करतो, ज्याला क्षणाला जागृती जाणवत असते तो भक्त  असे प्रतिपादन महंत रामगिरी यांनी आज एकादशी च्या कीर्तनातून केले. या साठी त्यांनी 

भक्ति कठीण सूळावरील पोळी | निवडे तो बळी विरळा शूर | हा अभंग घेतला होता.

तुका म्हणे मना पाहिजे अंकुश | 
नित्य नवा दीस जागृतीचा  हा दाखला देऊन साधकांनी मनावर अंकुश ठेवावा असे महंतांनी सांगितले.

काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात,उद्योजक विष्णू भागवत , येवला पंचायत समिती उपसभापती, विधान परिषद सदस्य किशोर दराडे, सहकार नेते अंबादास बनकर, बाळासाहेब कापसे, काळू पाटील वैद्य,प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, किरण चरमळ,शिवाजी भालूरकर शिवाजी ठाकरे, कमलाकर कोते, शिवाजी वाघ, गोरक्ष नालकर, कडू भाऊ काळे, अभय पाटील चिकटगावकर, रमेश बोरBणारे, साबीरभाई शेख, अंबादास बनकर, विठ्ठलराव शेलार , संतोष जाधव, अविनाश गलांडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, भाऊसाहेब झिंजुर्डे, बोऱ्हाडे, संजय निकम,सारंगधर  ठोंबरे, दत्तात्रय बहिरट, विजय कोते आदि उपस्थित होते.

No comments:

Post a comment