तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

घनशी नदीवरील तुटलेला पुल त्वरीत दुरुस्त करा-नवनाथ सरवदे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी व धर्मापुरी रोडला जोडणारा 45 वर्षापुर्वीचा पुल कोसळला असुन यामुळे या मार्गावरील वाहतुक नदीपात्रातुन होत आहे. दोन महिन्यापुर्वी कोसळलेला हा पुल प्रशासनाकडुन अद्याप दुरुस्त केला नसुन प्रशासनाने या पुलाचे त्वरीत बांधकाम करावे अशा मागणी नवनाथ सरवदे यांनी केली आहे.
              परळीपासुन जवळच असलेल्या घनशी नदीवर 45 वर्षापुर्वी बांधलेला पुल 2 महिन्यापुर्वी तुटला यामुळे यापुलावरुन वाहतुक बंद आहे. सदरील रस्तयावरुन धर्मापुरी, मिरवट, वैजवाडी, दारावती, कासारवाडी, नंदनज, सारडगाव, सावरगाव आदी गावातील वाहतुकीसह ग्रामिण भागातील दुध विक्री करणारे शेतकरी व परळीतील शेतकर्‍यांची येजा असते. हा पुल कोसळल्याने नदीपात्रातुन जावे लागत असुन घनशी नदीला पाणी आले तर हा रस्ता बंद होणार आहे. तसेच अर्धवट कोसळलेल्या पुलावरुन वाहनधारक जात असल्याने जिवितास धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष द्यावे व सदरील पुलाची लवकर नव्याने निर्मिती करावी अशी मागणी शेतकरी तथा सामजिक कार्यकर्ते नवनाथ सरवदे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment