तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना केवळ ऑनलाईन पुरतीचगेवराई, दि. १३ _ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) योजना केवळ ऑनलाईन पुरतीच असून तालुक्यातील एकाही  शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने या योजने बद्दल शेतकर्‍यां मध्ये नाराजी आहे.
     महाराष्ट्र शासन आणि जागतीक बँक यांनी संयुक्तपणे राबविला जात असलेला शेतीसाठी उपयुक्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) हा तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त ऑनलाईन पुरताच मर्यादित राहिला आहे. पाच ते सहा महिने दिलेल्या संकेत स्थळावर नोंदणी करून देखील अद्यापही कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही. तालुक्यातील ५२ गावात राबविला जाणाऱ्या प्रकल्पातील ४८ गावात समिती निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चार गावात अद्यापही समिती निवड प्रक्रियाच गावातील राजकारणामुळे पूर्ण झाली नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा, पॉलिहाऊस, वैयक्तीक व सामुदायिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, भूजल पुनर्भरण, शेडनेट, ठिबक व तुषार सिंचन, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, पाणी उपसा साधने, पाईपलाईन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, नाडे व कंपोस्ट उत्पादन युनिट, सेंद्रिय खत निर्मिती युनिट, बिजोत्पादन करणे असा विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतू शेतकऱ्यांनी उपलब्ध संकेत स्थळावर नोंदणी करून देखील कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने ही योजना ऑनलाईन पुरतीच मर्यादित आहे.
       सदरील योजना राबविण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याची मदत असली तरी येथील कर्मचारी वर्ग यामध्ये जास्त मनलावून काम करत असल्याचे दिसून येत नाही. तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांना देखील या विषयी कसल्याही प्रकारची माहिती नसल्याने ते या योजनेच्या संदर्भात अनभिज्ञ असल्याचे दिसून आले असून, माजलगाव येथील प्रकल्प अधिकार्‍यांना विचारण्याचा सल्ला दिला आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment