तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना मुस्लिम महिलांनी बांधल्या स्नेहबंधनाच्या राख्या


बाळू राऊत प्रतिनिधी 
घाटकोपर : जम्मू काश्मीर मधील 370 व तीन तलाक बंदच्या निर्णयाचे भारतातील सर्व मुस्लिम महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे आता आम्ही खरे स्वातंत्र्य जीवन जगू शकू अशी प्रतिक्रिया मुस्लिम महिला करत आहेत . देशहिताच्या निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज तमाम मुस्लिम  महिला व युवतींनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून स्नेहबंध जपले . भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या संकल्पनेतून घाटकोपर स्थानक परिसर येथे कलम ३७० आणि तीन तलाक बंदीतून महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे प्रश्न पोटतिडकीने हाताळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे ऋण व प्रेम जपण्यासाठी रक्षाबंधन एक अतूट स्नेहबंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रवक्ते अवधूत वाघ , स्थानिक नगरसेविका बिंदू त्रिवेदी , माजी नगरसेविका प्रतीक्षा घुगे , राजू घुगे , संजय सिंह व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी जुलैका सय्यद यांनी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले व तीन तलाक आणि काश्मीर 370 कलम रद्द केल्याने आज खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य झाल्याची भावना व्यक्त करत मुस्लिम महिला देखील आज खरे स्वतंत्र जीवन जगणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली . राज्याचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले की जे 70 वर्षात कुणाला जमले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले . आज आपला देश खरे स्वतंत्र जीवन जगत आहे आणि आज मुस्लिम महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण खरे मुक्त झालो , स्वतंत्र झाल्याची भावना दिसून येते आहे याचसाठी मोदी आणि फडणवीस यांच्याशी स्नेहबंध जपण्यासाठी महिलांनी त्यांना राखी बांधल्याचे अवधूत वाघ यांनी सांगितले . 


फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशहिताचा निर्णय घेतल्या बद्दल मुस्लिम महिला पारंपरिक काश्मीर पोशाखात मोदींना राखी बांधताना .

No comments:

Post a comment