तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

सिद्धार्थ महाविद्यालयात ग्रंथालय दिन उत्साहात


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- येथील सिद्धार्थ महाविद्यालय , मिटमिटा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.  एस आर रंगनाथन यांच्या  जयंती दिनानिमित्त ग्रंथालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,  यावेळी प्रा.शिलवंत गोपनारायण यांनी प्रास्ताविक   केले त्यामध्ये त्यांनी डॉ रंगनाथन यांचा जीवनारवर प्रकाश टाकत डॉ रंगनाथन यांनी दिलेल्या ग्रंथालयाच्या पाच सूत्रांबद्धल  चर्चा केली तसेच समाजाला  वाचनाची किती आवश्यकता आहे याचा  उहापोह केला तसेच ग्रंथालय चळवळ किती महत्वाची बाब आहे त्याबद्धल सखोल विवेचन केले , प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय  शर्मा  यांनी ग्रंथालयातील संधी व महत्व स्पस्ट करीत विध्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले .  यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा . नितीन  फंदे  होते . महाविद्यालयाच्या  प्राचार्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ . आय. डी .नाथ यांनी अध्यक्षीय समारोप करतांना म्हटले कि , "वाचाल तर वाचाल" या उक्तीचा उल्लेख करीत वाचनाचे महत्व सांगितले . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ.  मिलिंद आठवले यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि , ग्रंथ व ग्रंथालय तसेच सार्वजनिक वाचनालयांमुळे समाजामध्ये ज्ञाननिर्मिती   होते तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी  ई- ग्रंथालयंसोबतच, ग्रंथालयामध्ये जाऊन वाचन , मनन , चिंतन करण्याची आवश्यकता आहे तसेच ग्रंथालयीन सोयी सुविधांचा  उपयोग करून आणि अधिकाधिक वाचन करून  स्वतःचा  आणि पर्यायाने देशाचा विकास घडून आणणे गरजेचे आहे .असेहि डॉ . आठवले यांनी बोलतांना सांगितले. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.विनोद  अंभोरे यांनी मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले कि , आजच्या पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता शासनस्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे  .  सूत्रसंचलन श्री राम  जाधव यांनी केले तर  आभार प्रदर्शन विशाल पठाडे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   ,सतीश  जाधव , महेंद्र चौधरी व कल्याण नलावडे यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment