तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न


परळी वैजनाथ दि.13 (प्रतिनिधी) :-येथील थर्मल विभागातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात १४ वर्षे १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मंगळवारी उत्साहात संपन्न झाल्या.
                                       स्पर्धेचे उद्घाटन न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. टी देशमुख यांनी केले. तसेच याप्रसंगी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळराव काकडे, न्यू हायस्कूल चे पर्यवेक्षक एस. आर. देशमुख, क्रीडा स्पर्धेचे संयोजक बी.व्ही.अनकाडे, नानेकर सर,न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा.सुनील लोमटे, प्रा.डॉ.सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
                               मुलींचे व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळा परळी, न्यू हायस्कूल सिरसाळा व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय परळी या संघांनी अनुक्रमे १४ वर्षे १७ वर्षे व१९ वर्षे वयोगटातील प्रथम क्रमांक पटकावले. तसेच १४ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत विद्यावर्धिनी विद्यालय व न्यू हायस्कूल परळीच्या संघांनी अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकावला.
                 मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम तर विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटात फाउंडेशन स्कूल ने प्रथम तर हायस्कूल सिरसाळा च्या संघांने द्वितीय क्रमांक  पटकावला. १९ वर्षे वयोगटात राजर्षी शाहू महाराज आश्रम शाळा कौडगावच्या संघाने प्रथम तर न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय परळीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
                                          स्पर्धांचे यशस्वीतेसाठी न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच प्रा.ईश्वर कांबळे, नारायण वानखेडे, नागटिळक सर,दीपक कदम, व्हावळे सर, निर्मळ सर, विजय मुंडे, ताटे,साळवे, प्रल्हाद नखाते, गणेश सोळंके आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment