तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

प्रा.टी.पी.मुंडे यांच्या रस्ता रोको आंदोलनाचे यश; परळी

 अंबाजोगाईतील तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मंजुर, बुधवारपासून होणार वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा  टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या 3 तास रस्ता रोको आंदोलनामुळेच अखेर परळी, अंबाजोगाई तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून सोयाबीनच्या पिक विमा साठी हे आंदोलन केले होते तो मंजूर झाला असून  बुधवारपासून तो खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

परळी, अंबाजोगाई तालुक्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती मात्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या या पिकाला उत्पन्न मिळू शकले नाही.

 हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढूनही कंपनीने मात्र पीक विमा देण्यास टाळाटाळ केली संपूर्ण बीड जिल्ह्यातील 11 पैकी नऊ तालुक्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला असताना परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र यातून वगळण्यात आले त्या पाठोपाठ आलेल्या दुष्काळामुळे आणि पिक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण पसरले होते.

 सोयाबीन पीक विम्याचा च्या हा प्रश्न काँग्रेसचे  प्रदेश सरचिटणीस  प्रा  टी पी मुंडे सर यांनी हाती घेऊन दि 29 जुलै रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन केले होते एवढेच नव्हे तर त्यांना मागील 15 दिवसापूर्वी परळी तहसील कार्यालयाने 15 दिवसाच्या आत सोयाबीन चा पिक विमा मंजूर करू असे आश्वासन परळी तहसीलच्या व डेपोटी कलेक्टरच्या प्रतिनिधींनी दिले होते तब्बल तीन तास भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते .

 जोपर्यंत पिक विमा मंजूर होणार नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाला नमते घेत 15 दिवसात पिक विमा वाटप करू असे आश्वासन द्यावे लागले होते.  या आश्वासनाची प्रशासनाने पूर्तता करत पीक विमा मंजूर केला असून  बुधवारपासून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पीक विमा मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून हा पिक विमा केवळ आणि केवळ काँग्रेसचे  प्रदेश सरचिटणीस  प्रा  टी पी  मुंडे  सर यांच्या रस्ता रोको आंदोलनामुळे मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत

शेतकऱ्यांनी मानले आभार

दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर नेहमीच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करून  न्याय देण्याचे काम केले आहे सोमवार दि 29 जुलै रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्याला सोयाबीनचा पिक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले होते याच आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना चौदाव्या दिवशीच शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात विमा जमा होणार आहे हे फक्त प्रा टी पी मुंडे सरच करू शकतात ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी प्रा टी पी मुंडे सर यांचे आभार मानले आहेत मात्र एकीकडे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरुवातीलाच आंदोलन करते व दुसरीकडे दुसरे राजकीय पक्ष श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

No comments:

Post a comment