तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 August 2019

आ. मोहनभाऊ फड यांनी चिमुकल्या आयुषचे आयुष्य वाचवले ...!किरण घुंबरे पाटील

पाथरी:-पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ.मोहन फड यांनी आरोग्य सेवेचे पवित्र व्रत जोपासले आहे .
पाथरी शहरात एकता नगर येथील श्रीधर खांडके यांचा मुलगा आयुष श्रीधर खांडके वय १० याला जन्मजात हृदयाला छिद्र होते.आमदार मोहन फड यांनी मतदार संघातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी व्रत हाती घेतले आहे. यावर नमूद बालकावर आमदार मोहन फड यांच्या मार्गदर्शना खाली व मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या सहकार्याने मुंबई येथील वखाड रुग्णालयातील डॉ. जोशी आणि डॉ. मनीष यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली..! आयुषच्या आई व वडिलांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे, वखार्ड हॉस्पिटलमधील डॉ मनीष व डॉ जोशी यांचे आभार मानले
यासाठी,पप्पू नखाते ,बाबा शेख  या आरोग्यमित्रांची साथ लाभली.

No comments:

Post a Comment