तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

धनंजय मुंडे यांच्या आंदोलनाचे यश; परळी अंबाजोगाईतील तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मंजुर, आजपासून होणार वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या सात तास ठिय्या आंदोलन आणि मोर्चामुळे अखेर परळी, अंबाजोगाई तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून सोयाबीनच्या पिक विमा साठी हे आंदोलन केले होते तो मंजूर झाला असून उद्या बुधवारपासून तो खात्यावर जमा करण्यात येणार आहे. 

परळी, अंबाजोगाई तालुक्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती मात्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या या पिकाला उत्पन्न मिळू शकले नाही. 

 हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढूनही कंपनीने मात्र पीक विमा देण्यास टाळाटाळ केली संपूर्ण बीड जिल्ह्यातील 11 पैकी नऊ तालुक्यांमध्ये पिक विमा मंजूर झाला असताना पळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र यातून वगळण्यात आले त्या पाठोपाठ आलेल्या दुष्काळामुळे आणि पिक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचे वातावरण पसरले होते. 

 सोयाबीन पीक विम्याचा च्या हा प्रश्न धनंजय मुंडे यांनी हाती घेऊन सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला एवढेच नव्हे तर त्यांनी मागील आठ दिवसापूर्वी परळी तहसील कार्यालयासमोर तब्बल सात तास ठिय्या आंदोलन भरपावसात केले.  त्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. 

 जोपर्यंत पिक विमा मंजूर होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे प्रशासनाला नमते घेत तीन दिवसात पिक विमा वाटप करू असे आश्वासन द्यावे लागले होते.  या आश्वासनाची प्रशासनाने पूर्तता करत पीक विमा मंजूर केला असून उद्या बुधवारपासून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पीक विमा मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून हा पिक विमा केवळ आणि केवळ धनंजय मुंडे यांच्या आंदोलनामुळे मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

पालकमत्र्यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या

पिक विमा मंजूर होताच भाजपाच्या पालकमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे याचे श्रेय घेण्यासाठी प्रसिद्धीपत्रक काढले आहेत.   मात्र या भागातील सुजान जनतेला त आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्यासाठी कोणी आंदोलन केले आणि कोणी मिळवून दिला हे ज्ञात असल्यामुळे त्यांच्या या प्रसिद्धीपत्रकात चांगलेच हसे होत आहे.  प्रसिद्धीपत्रक काढण्यापेक्षा मंत्रिपदाचा वापर करून यापूर्वीच विमा मिळवून दिला असतात आम्ही तुमचे अभिनंदन केले असते अशा प्रतिक्रियाही शेतकरी वर्ग व्यक्त करू लागला आहे.

1 comment:

  1. Udgir talukyatil. Nilgir sarkal made pan pikvima milala nahi. Baga kahi hotay ka

    ReplyDelete