तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

महिला पूरग्रस्तांना महिला बालविकास विभागामार्फत ४५ हजार सॅनिटरी नॅपकिन्सचा होणार पुरवठाना. पंकजाताई मुंडे यांनी दिली माहिती

मुंबई (प्रतिनिधी) :- दि. १२ ----- पश्चिम महाराष्ट्रील सांगली, कोल्हापुर व सातारा येथील पुरपरिस्थिती आता पुर्ववत होत आहे. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक, राजकीय संस्था, विविध मंडळे आपला हातभार लावत आहेत. मात्र, प्रामुख्याने पुर परिस्थिती ओसरल्यानंतर आरोग्याच्या व विविध रोगांच्या समस्यांना तोंड पुरग्रस्तांना प्रामुख्याने महिला व लहान मुलांना द्यावे लागणार आहे.याच पार्श्वभूमीवर, राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या खात्याकडून पुरग्रस्तांना साथीचे आजार व रोग टाळण्यासाठी महिला आरोग्याची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘उमेद’ मार्फत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयातील महिला पूरग्रस्तांना दिलासा देऊन प्राथमिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकी आठ अस्मिता प्लस असलेली ४५ हजार सॅनेटरी नॅपकिन्सची पॅकेट्स उपलब्ध करून पुरग्रस्त महिलांना पाठवण्यात येणार आहेत.

पुरग्रस्त भागात विविध सरकारी बचाव पथक अथक प्रयत्न करीत मदत करत असताना तिथे जाऊन या प्रणालीला अडथळा आणू नका. तर आपापल्या सर्व संभाव्य मार्गाने पूरग्रस्तांना पुर्ववत करण्यासाठी संवेदनशील राहून मदत करू या असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी ट्विटर वर ट्विट करत केले आहे.

No comments:

Post a Comment