तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

बहुजन समाज एकञच असून या एकीला सर्वांची ताकद महत्त्वाची - सुदेश पोतदारसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १२ _ तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी यांच्या मिञ पक्षांची तसेच संघटनांची बैठक संपन्न झाली. या बैठकीचे “मिशन २०१९ विधानसभा” हे उद्दीष्ट समोर ठेवुन सर्व मिञ पक्षांनी एकञ येवुन गटतट बाजुला ठेवुन एक दिलाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करुन निवडुन आणन्याची जिम्मेदारी घेवुन सर्वांनी धडाडीने कामाला लागावे असे सुदेश पोतदार यांनी यावेळी बोलतांना कार्यकर्त्यांना संबोधित केले.
           सर्वप्रथम बैठकिस उपस्थीतांनी कोल्हापुर, सांगली येथील पुरात मृत पावलेल्या नागरीकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आणि पुरग्रस्तांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. दरम्यान बहुजन समाज एकञ आला आहे, आता त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करावे या एकीला ताकद मिळाली तर महाराष्ट्रात सत्ता हि वंचीत बहुजन समाजाचीच असेल असे पोतदार यांनी सांगितले. या बैठकीला धम्मानंद साळवे, प्रशांत बोराडे, जीवन राठोड यांनी केले, यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या बैठकीस अजयकुमार (पप्पु) गायकवाड, सुभानभाई सय्यद, ज्ञानेश्वर हवाले, सचिन सुतार, अनिल तुरुकमारे, रामदास मोरे, भाऊ बनसोडे, अजय खरात, सतिष प्रधान, मुन्ना पहाड, अशोक केदार, किरण कांबळे, प्रदिप बांगर, रवि बांगर, अमोल बांगर, गणेश बांगर, प्रेम बांगर तसेच शेकडो भारीप, एआयएमआयएम, डीपीआय, बंजारा संघटना आदी वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन नितिन दोडके यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार नितीन खापरे यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment