तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

पुराच्या पाण्याने वानखेड गावातील मुख्य रस्तावर खडडा, रस्ता उखडला चारचाकी वाहन येणे बंद विद्यार्थी, भाविक, नागरिक त्रस्त
संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वानखेड गावात जगदंबा देवि संस्थान सर्वत्र प्रसिद्ध असल्याने या गावात दररोज परिसरातील भावीक दर्शनासाठी नेहमी गर्दी फुललेली असते विद्यार्थी शिक्षणासाठी नागरिक व्यक्ति कामासाठी एस टी ,खाजगी वाहनाने प्रवास करित असतात पुराच्या पाण्याने गावातील मुख्य रसत्यात रवडडा पडून उखडला असल्याने संबंधीत विभाग तसेच स्थानीक प्रशासन दुर्लक्ष करित असल्याची ओरड होत आहे  सातपुडयात दमदार पाऊस झाल्याने वाननदीवर हनुमान प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने प्रकल्पाचे पाणी वाननदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने वाननदीला भलामोठा पुर आला होता तर पुराचे पाणी वानखेड येथील पुलावरून गेल्याने या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटला होता पुराच्या पाण्याच्या जोराने वानखेड मधील मुख्यरस्ता हनुमान मंदिराजवळ उखडला मुख्य रस्ता उखडल्याने गावात स्कुल बस, एस टी बस खाजगी चारचाकी वाहन येणे बंद झाल्याने दर्शनासाठी येणारे भाविक, विद्यार्थी सह नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने मुख्य रसत्यावर पुराच्या पावसाने पडलेला खडडा अपघाताला निमंत्रण देत असल्याने संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित खडडा भुजविण्यात यावा स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

No comments:

Post a comment