तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 12 August 2019

प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांची निवडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांची स्वा.रा.ति.म.वि. नांदेड विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग सदस्य  व परभणी जिल्हा समन्वयक या  पदावर मा.कुलगुरु यांनी निवड केली आहे. स्वा.रा.ति.म. विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ.उध्दव भोसले सरांनी प्रा.जायभाये यांच्या मागील वीस वर्षात केलेल्या विविध स्तरावरील  सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक  कार्याची दखल घेऊन हि निवड केली आहे. या निवडीबद्ल नुकताच त्यांचा संस्था अध्यक्ष मा.परमेश्वर कदम साहेब, पी.आय.गजानन भातलवंडे, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल स्वा.रा.ति.म.वि. नांदेड विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.जे.एम.बिसेन, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे तसेच सोनपेठ येथिल संपादक, सर्व पत्रकार मित्र, वरपुडकर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment