तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

रिक्षाचालऊन पोटभरणाराची पुरग्रस्तांना पाच हजाराची मदत

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-सांगली,कोल्हापुर या जिल्ह्यात पंचगंगा,कष्णा आणि इतर नद्यांनी अनेकांचे प्राण घेत संसार उधवस्त केले.या विषयीच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून पहात अनेकांची मने विव्हळली परिणामी हेच हात मदती साठी पुढे आले पाथरी शहरातील मदत फेरी वेळी रस्त्यावर भिक मागुन उदरनिर्वाह करणा-याने  मनाची श्रीमंती दाखवत पै-पै  जमा केलेली दोन हजाराची रक्कम पुरग्रस्तां साठी मदत म्हणून दिल्या नंतर आता परभणी येथील एका रिक्षाचालकाने रात्रं दिवस मेहनत करून जमा केलेली पाच हजार रुपयांची मदत पुरग्रस्तांना मदत करण्या साठी जन्मभूमी फाऊंडेशनला दिली अाहे.
परभणी येथे  गेली तीस वर्षा पासून अॅटोरिक्षा चालवत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे सुरेश बाबूराव भिसे हे आपल्या अॅटोरिक्षातुन आजही अपंगांना मोफत सेवा देतात मी समाजाचे काही देणे लागतो,संकटात एकमेकांना साह्य व्हाव,संकटांनी खचून न जाता त्यांना नवी उमेद मिळावी हाच या कार्या मागचा उद्देश असल्याचे सुरेश बाबूराव भिसे हे सांगतात दुस-याची  मदत केल्याने कमी होत नाही तर जास्तिच समाधान मिळतं असं ही ते आवार्जून सांगतात गेली काही दिवस मी टी व्ही पेपर मध्ये बातम्या पहातोय अक्षरश:  मन पिळवटून आलं आणि माझ्या चटकन लक्षात आलं की पाथरीतून या साठी पाथरीकर थेट मदत पुरग्रस्तांना करणार आहेत.त्या मुळेच जन्मभूमी फाऊंडेशन ला संपर्क साधला आणि माझ्या घर खर्चा साठीची पाच हजार रुपयांची मदत मी पुरग्रस्तांना जिवनावश्यु वस्तू घेऊन देण्या साठी करत असल्याचे सांगितले.आणि ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जन्मभूमी फाऊंडेशनच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी सांगितले. पाथरीत भिकेतील दोन हजार रुपया नंतर आता एका रिक्षा चालकाने पाच हजार रुपयांची मदत पुरग्रस्तांना केल्या या दोघांच्या संवेदलशिलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाढदिवसाचा निधी पुरग्रस्तांच्या मदतीला
येथील स्व नितिन कला व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी आ हरिभाऊ लहाने यांच्या वाढदिवसा निमित्य जमा केलेला सतरा हजार तिनशे रुपये निधी पाथरीकर जमा करत असलेल्या पुरग्रस्तां साठी प्राचार्य डॉ राम फुन्ने,प्रा डॉ निर्वळ  यांच्या हस्ते समिती कडे  देण्यात आला तर पत्रकार किरण घुंबरे यांच्या वाढदिवसा निमित्त सय्यद गुलशेर खान मामा यांनी चार हजार,अभियंते सतिष कोल्हे यांनी एक हजार,सुनिल जाधव यांनी पंचविस किलोची गव्हाची अटा बॅग आणि पत्रकार माणिक केंद्रे यांनी पाचशे रुपयांची मदत केली.पाथरीकरांना फेरीच्या माध्यमातून एक लक्ष आठ हजाराचा निधी प्राप्त झाला.तर बकरी ईदच्या नमाजा वेळी केवळ अर्ध्या तासात एकलक्ष साडे सहा हजाराचा निधी जमा झाला होता. ग्रामिण भागात जमा केलेली रक्कम आणि धान्य दोन दिवसात प्राप्त झाल्या नंतर ही सर्व मदत पुरग्रस्तांना थेट देण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.पुरग्रस्तांना मदत देण्या साठीचे नियोजन युद्ध पातळीवर पाथरीत होत आहे.

No comments:

Post a Comment