तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

'धरण भरले तुडुंब..' आता, दुष्काळी मराठवाड्याला नाथसागराचा आधार

सुभाष मुळे, गेवराई
------------------------
गेवराई : दुष्काळी मराठवाड्याची दैना फिटते फिटेना झाली आहे. या भागात पाण्याची पातळी वाढेल असा कसलाही पाऊस पडला नाही. अशा परिस्थितीत या दुष्काळी मराठवाड्याला सगळ्यात मोठा आधार म्हणजेच नाथसागर आहे हे धरण आहे, म्हणजेच मराठवाड्यासाठी नवसंजीवनी देणारे असून या भागात पावसाचे प्रमाण नसतानाही हे नाथसागर धरण तुडुंब भरले असल्याने मराठवाड्याला हा मोठा आधार मिळाला आहे.
          जायकवाडी धरणात १२ व्या दिवशीही पाण्याचा ओघ सुरूच आहे. शनिवार व रविवारी देखील दिवसभर जलौघ दाखल झाल्याने जलाशयाची टक्केवारी वाढली आहे. रात्री ऊशिरानंतर वरच्या प्रकल्पातून पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे पोहचला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत 63,332 क्युसेकने आवक सुरू असून पाणीसाठी ८०.१७ टक्के झाला आहे. तर नाथसागरात ७३,७८९ क्युसेकने आवक होत आहे. एकुण १५५२ फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पात २९ जूलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे १४९२ फूटांपर्यंत घसरलेली पाणीपातळी ११ व्या दिवशी १५१८.१५ फूट एवढी झाली आहे. पाणी साठ्यात एकूण २६ फूटांनी वाढ झाली आहे. जायकवाडीच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या विक्रमी गतीने पाणी पातळी वाढली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी आता केवळ ४ फूट पाणीपातळीची गरज आहे. १४६२.७६२ मी. असलेल्या या पाणीसाठ्यात सध्या प्रतिसेकंद ६३,३३२ क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाणी येत आहे. धरणात एकुण पाणीसाठा २३९९.७८० दशलक्ष घनमीटर एवढा असून वापरायोग्य (जिवंत पाणीसाठा) जलसाठा १६६१.६७४ दशलक्ष घनमीटर आहे, अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी दिली. 
       नांदुर मधमेश्वर व नागमठाण या धरणातून जलविसर्ग वाढवण्यात येणार असल्याने जायकवाडीच्या नियंत्रण कक्षातील यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून काल रात्री ९ पासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हा जलविसर्ग ४०० क्युसेक्सवरुन दुपारी ३ वाजता ६०० क्युसेक्स प्रतिसेकंद करण्यात आला आहे. रात्री यात पुन्हा वाढ करून ९०० क्युसेक्स प्रतिसेकंद केला जाणार आहे. नाथसागरमधून माजलगाव धरणात एकुण ७५ दशलक्ष घनमीटर (अडीचटीएमसी) एवढे पाणी देण्याबाबत जलसंपदा मंत्रालयातून सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार हे पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उपविभागाचे स्थापत्य अभियंता राजाराम गायकवाड यांनी दिली.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment