तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

धम्मानंद मुंडे कुटुंबियांचे धनंजय मुंडेंकडून सांत्वनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15........... रिपाई नेते कै.धम्मानंद मुंडे यांच्या कुटुंबियांची आज विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंंडे यांनी भेट घेवुन सांत्वन केले. 

कै.धम्मानंद मुंडे यांचे चार दिवसांपूर्वीच दुःखद निधन झाले होते. यावेळी त्यांच्या समवेत चंदुलाल बियाणी, सुरेश टाक, डॉ.संतोष मुंडे, वाल्मिकअण्णा कराड, अनंत इंगळे, रवि मुळे, महेंद्र रोडे, महादेव रोडे, धम्मा अवचारे, राजेभाऊ पौळ, प्रितम जाधव, शेख शम्मो व पदाधिकारी उपस्थित होते. 

धम्मानंद मुंडे यांच्या निधनाने परळी शहरातील सर्व पक्षीय संबंध असणारे आणि परळीचा बुलंद आवाज असणारे व्यक्तिमत्व हरपले असून, त्यांच्या स्मृती परळीकरांच्या कायम स्मरणात राहतील असे मुंडे म्हणाले.

No comments:

Post a comment