तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

महिला महाविद्यालयात सुदृढ भारत अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रम



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
दि 29 ऑगस्ट 2019
" सुदृढ भारत अभियान " अंतर्गत कै . लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात परळीतील ख्यातकीर्त स्त्रीरोगतज्ञ व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शालिनीताई कराड यांचे सविस्तर मार्गदर्शन झाले .भारतात सर्वाधिक दुर्लक्षित असलेला महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आणि त्याची सोडवणूक करण्याचे अनेक उपाय त्यांनी याप्रसंगी मांडले  . आज जगातील अनेक देश पर्यावरणाच्या समस्या, जागतिक तापमानवाढ इत्यादी विषयावर आपली शक्ती खर्च करत असताना भारत देश मात्र आणखी पायाभूत प्रश्न सोडविण्यात मग्न आहे . गरीबी , आरोग्याचे प्रश्न ,  सॅनिटरी नॅपकिन अशा मूलभूत प्रश्नांमध्येच भारताची सर्व शक्ती खर्ची पडत आहे हे दुर्दैवी आहे , असे प्रतिपादन त्यांनी केले . परिवारामध्ये महिलेने सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी बालवयातच मुलींनी मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपले पाहिजे , शरीर सुदृढ व निरोगी ठेवले पाहिजे यांची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली . पुढे त्यांनी त्यांच्या वक्तव्यात  केंद्र सरकारद्वारे सुदृढ भारत अभियान अंतर्गत असलेल्या वातावरणाची शुद्धता  , स्वच्छ भारत अभियान , आयुष्यमान भारत योजना , परिसर स्वच्छता , पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजना , माझी कन्या भाग्यश्री योजना इत्यादी मुद्द्यांचा सविस्तर उहापोह केला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रा. अरुण चव्हाण यांनी भारतीय शास्त्र परंपरेच्या आधाराने सुदृढ भारत बनण्यासाठी योग व आयुर्वेदाची आवश्यकता प्रतिपादन केली. याच कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा . प्रसादजी देशमुख यांनी प्राचार्या डॉ आर जे परळीकर मॅडम त्यांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे स्वतःसाठी आणि देशासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगितले . त्यासाठी रोज व्यायाम आणि योग्य आहार याला महत्त्व आहे हे पटवून दिले .भारताची चाळीस टक्के लोकसंख्या ही युवा असून या युवा शक्तीचा उपयोग भारत देशाच्या कल्याणासाठी व्हायचा असेल तर तो युवावर्ग सुदृढ असला पाहिजे असे त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.  शारीरिक आणि मानसिक निकोपता  मातृशक्तीला अधिक आवश्यक आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी  संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक  अनिलरावजी देशमुख  संस्थेचे अध्यक्ष मा  संजयजी देशमुख आणि  संस्थेचे सचिव मा . रविंद्रजी देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या .
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी  प्रा. डॉ. पंढरीनाथ गुट्टे यांनी मांडले . सूत्रसंचालन  महाविद्यालयाची विद्यार्थिनी  कु . तारा पदमपल्ले हिने केले तर  मराठी विभागाचे प्रा. एस एस नेरकर यांनी आभार मानले .
          याप्रसंगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी  कोमल सोनवणे ही मराठी विषयात डॉ . बा .आं. मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम आल्याने तिचा हृद्य सत्कार प्रमुख व्याख्यात्या डॉ. सौ.शालिनीताई कराड , संस्थेच्या संचालिका प्रा . डॉ .सौ .विद्याताई देशपांडे आणि संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख , मराठी विभागप्रमुख प्रा .डॉ .आर.के. यल्लावाड व  व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला .
     आज राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून क्रीडा महर्षी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला  .याप्रसंगी रोज मैदानी खेळ मुलींना आवश्यक असल्याचे प्रतिपादन शालिनीताई कराड यांनी केले. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रविण दिग्रसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा क्रीडा दिनाचा समारंभ पार पडला.
      या सर्व कार्यक्रमाच्या  यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला व या कार्यक्रमानुसार जीवनात वागण्याची प्रतिज्ञा घेतली.

No comments:

Post a Comment