तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

स्मार्ट ग्राम पुरस्काराने शेकापुर सन्मानितफुलचंद भगत
अकोला- दि. 15 /08/2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून  जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री रणजित जी पाटील ,जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र पापकळर  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष्य प्रसाद पोलीस अधीक्षक श्री अमोघ गावकर. यांच्या हस्ते स्मार्ट ग्राम  पुरस्कार अकोला जिल्ह्यातील  पातूर तालुक्यातील ग्राम पंचायत शेकापूर यांना देण्यात आला. तो पुरस्कार  स्वीकारताना ग्रामपंचायतीच्या सरपंच गौकर्णा बाई लक्ष्मण शेळके . व ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे आदींची ऊपस्थीती होती.
        ग्रामपंचायत शेकापूर येथे   सन2017/18 या वर्षी गावांतील कर वसुली,  सांडपाणी व्यवस्थपन , दिवाबत्ती, हागणदारीमुक्त ग्राम,  जलयुक्त शिवार, पाणि फौंडेशन संयुक्त वन व्यवस्थापन ,वृक्षारोपण इत्यादी कामे  चांगल्या प्रकारे राबविले आहे . या स्पर्धेत पातूर तालुक्यातील सर्वं ग्रामपंचयतीने सहभाग घेतला होता. त्याचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये सर्वात जास्त गुण हे ग्रामपंचायत शेकापूर ला मिळाले होते.  त्यामुळे ग्रामपंचायत ला 10 लक्ष रुपये मिळणार असून तो निधी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येऊन शेकापूर हे गावं खऱ्या अर्थाने स्मार्ट ग्राम करण्याचा मानस असल्याचे ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे व्यक्त केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment