तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

स्व नितिन महाविद्यालयात युवादिना निमित्त एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितीन महाविद्यालयात  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई आणि रासेयो विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त एड्स विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य राम फुन्ने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा बदने या होत्या तर मंचावर कार्यक्रमाचे मार्गदर्शक गव्हाणे ,वडजे हे होते.या वेळी प्रा डॉ सुरेश सामाले, प्रा डॉ साहेब राठोड, प्रा डॉ जी जे मोरे यांची उपस्थिती होती यो वेळी शाहिर बुरखुंडे, पंढरीनाथ महाराज, सलिम कव्वालीवाले, तबलावादक हनुमान बोडखे,शाहीर डंबाळे  यांनी गितातुन प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रास्ताविक रासेयो विभाग प्रमुख प्रा मधूकर ठोंबरे यांनी केले तर आभार प्रा टी एफ काळे यांनी मानले.या कार्यक्रमा साठी प्रा डॉ जे एम बोचरे, प्रा संजयसिंग प्रतापसिंग ठाकूर, किरण घुंबरे यांच्या सह महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment