तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

इंग्लिश महिला क्रिकेटपटूचे विवस्त्र फोटो सेशन                    इंग्लंडची अतिशय सुंदर व देखणी महीला खेळाडू जी आपल्या नजाकतदार फलंदाजीने व यष्टीमागील विद्युतगती यष्टीरक्षणाने संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.आपल्या शानदार खेळाने तिने सन २o१६ चा विश्व कप इंग्लंडला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

                  नुकताच तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकौंटवर स्वतः यष्टीरक्षण करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने स्टंप्स वरील बेल्स उडविल्या आहेत. हातात विकेट किपींग ग्लोव्हज‌ घातले आहेत परंतु अंगात कोणतेही वस्त्रं दिसत नाही. याचा अर्थ असा कि, ती पूर्णपणे निर्वस्त्र आहे. 

                  साराच्या बाबत सर्व सामान्य क्रिकेट शौकीनांना ज्ञात नसलेल्या काही ठळक बाबी येथे खास आपल्यासाठी विशद करत आहे.सारा जेन टेलर हिचा जन्म २o मे १९८९ रोजी इंग्लंडमध्ये झाला. 

                  महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात केली. या सामन्यात कमी धावसंख्येचं लक्ष्य देऊनही इंग्लंडच्या संघाने शेवटपर्यंत आपली हार मानली नाही. अॅना शर्बसोलने ६ बळी घेत भारतीय संघाची मधली फळी कापून काढली. मात्र या संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडची सारा टेलर चर्चेचा विषय ठरली होती. आपल्या खेळासोबत चार्मिंग लुक्समुळे सारा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. सारा टेलरने आपल्या मानसिक आजारावर मात करत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. आपल्या सुंदर खेळाने सारा इंग्लंडच्या महिला संघाची आधारस्तंभ बनलेली आहे. 

                बुजूर्गांची पंगत म्हणून ओळखल्या जात असलेल्या ‘लेजंड लेन’मध्ये स्थान मिळालेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये ‘ससेक्स’ या क्लबचं प्रतिनिधीत्व करुन चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना लेजंड लेनमध्ये समावेश केला जातो. वयाच्या २६ व्या वर्षी सारा टेलरने हा बहुमान मिळवला होता. टोनी ग्रेग, सी.बी.फ्राय, जॉन स्नो, मॅट प्रायर, मुश्ताक अहमद यासारख्या दिग्गज खेळाडूंचा या लेनमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
                  सारा इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात निवड झालेल्या सर्वात कमी वयातील खेळाडूंपैकी एक आहे. लंडन शहरातल्या ब्रिग्टन महाविद्यालयात आजही मुलं आणि मुलींच्या संघात क्रिकेटचा सामना भरवला जातो. अशाप्रकारे क्रिकेटचा सामना भरवणारं ब्रिग्टन हे इंग्लंडमधल्या महत्वाच्या शहरांपैकी एक आहे. सारा टेलर याच कॉलेजमधून महिलांच्या संघात खेळत होती. वयाच्या १७ वर्षी साराचा खेळ पाहून तिला इंग्लंड महिलांच्या राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आलं होतं. भारताविरुद्ध सन २००६ मध्य ऐतिहासीक लॉर्ड्सच्या मैदानात साराने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.
                    अगदी कमी वयात अनेक विक्रम  तिच्या नावावर आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर २००९ साली सारा वन-डे सामन्यांमध्ये सर्वात जलद १००० धावा काढणारी महिला खेळाडू ठरली. २०१२ साली सारा टेलरला टी-२० ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं होतं. यानंतर २०१४ साली साराला आयसीसीने वन-डे सामन्यांची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून घोषीत केलं होतं. सन २०१५ मध्ये पुरुषांच्या संघातून खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनण्याचा मानही सारा टेलरने मिळवला आहे. आतापर्यंत साराने ११० वन-डे सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यात तिने ३६५७ धावा काढल्या आहेत. याचसोबत कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये तिची कामगिरी चांगली आहे.
                    साराचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने कामगिरीवर परिणाम झाल्याचं चर्चीलं गेलं.  सन २०१६ साल सारा टेलरसाठी आव्हानात्मक ठरलं होतं. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे तिची मैदानातली कामगिरीही खालावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत ३ सामन्यांमध्ये साराने केवळ ४३ धावा केल्या होत्या. भारतात महिलांच्या टी-२० विश्वचषकातही ती आपल्या नेहमीच्या फॉर्ममध्ये नव्हती.  याविषयी बोलताना, त्या कालावधीत आपलं मानसिक स्वास्थ्य योग्य नसल्याचं साराने मान्य केलं होतं. यामुळे आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर तर परिणाम झालाच, मात्र आपल्या खासगी आयुष्यावरही याचा वाईट परिणाम झाला असं साराने मान्य केलं.
                 पण, या मानसिक नैराश्यातून साराने स्वतःला लवकर सावरलं. राखेतून एखादा फिनीक्स पक्षी जशी भरारी घेतो तशी सारा टेलर क्रिकेटच्या मैदानात परत आली. यासाठी इंग्लंडच्या महिला संघाचा दुबईत विशेष कँप झाला होता, ज्यात साराने स्वतःचा खेळ सुधारण्यावर मेहनतही घेतली होती. आतापर्यंत आपण जे काही मिळवलं त्याचा मला अभिमान असल्याचं साराने सांगितलंय. सन २०१६ मध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत साराने ९ सामन्यांमध्ये ३९६ धावा काढल्य

No comments:

Post a Comment