तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

जायकवाडीचे पाणी खडका प्रकल्पात सोडा - धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई (प्रतिनिधी) :- दि 13 ----- जायकवाडी धरणाचे पाणी खडका प्रकल्पात  सोडून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला त्याच बरोबर पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून जनतेच्या हिताच्या 25 मागण्याही निवेदनाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या .

त्याचवेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत मुंडे यांनी जायकवाडी पाणी खड्ड्यात सोडून परळी शहराचा पाणी प्रश्न मिटवावा अशी मागणी केली.

 पावसाअभावी परळीला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.  कठीण परिस्थितीतही नगरपालिकेने मागील पाच महिन्यात शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू दिले नाही मात्र सध्याच्या परिस्थितीत टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे भविष्यात ही समस्या अधिक बिकट होणार आहे.

 त्यामुळेच मागील दोन महिन्यांपासून जायकवाडीचे पाणी खडक्यात सोडून त्याद्वारे परिसराला पाणीपुरवठा करावा यासाठी धनंजय मुंडे हे शासन दरबारी सातत्याने प्रयत्नशील आहेत.  यापूर्वी त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची या संदर्भात भेट घेऊन परवानगी मिळवली होती.

 मात्र खडका  प्रकल्पात पाणी नसल्यामुळे हे पाणी परळीला मिळू शकले नाही.

सध्या जायकवाडी जवळपास शंभर टक्के भरले असल्यामुळे त्यातून खडका येथे पाणी सोडणे शक्य आहे त्यामुळे औष्णिक विद्युत केंद्र सुरु होण्याबरोबरच शहराचा पाणीप्रश्न सुटू शकतो त्यामुळे आज धनंजय मुंडे यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात  घेऊन गेले याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच कार्यवाही होईल अशी आशा निर्माण झाली आहे

No comments:

Post a comment