तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

ना.धनंजय मुंडे आरोग्यमित्र शिर्डी विभागपदी विशाल मनोज भडांगे यांची निवड-डाॅ.संतोष मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्याला खरोखर गोरगरिबांची सेवा करावयाची आहे. अशा महाराष्ट्रातील तळमळीच्या युवक व युवतींना संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. धनंजय मुंडे साहेब आरोग्यमित्र ही संघटना काढण्यात आलेली असून या संघटनेच्या माध्यमातून कामकाज करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्यमित्र नेमून गोरगरिबांची सेवा  करण्यासाठी नवतरुणांना संधी उपलब्ध करून देऊन या संघटनेच्या माध्यमातून श्री साईबाबा संस्थान शिर्डी मुंबई व पुणे येथील मोठ्या धर्मार्थ रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया ( कॅन्सर ब्रेन ट्युमर, हार्ट सर्जरी डोळ्याचे ऑपरेशन, हाडाचे ऑपरेशन) तसेच नाना विधी रोगांचे उपचारासाठी व ग्रामीण भागातील व शहरातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रसूती कुटुंबनियोजन ऑपरेशन व सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी मदत करणे तसेच दवाखान्यात दाखल करणे, गावोगावी आरोग्याची जनजागृती करणे, रक्तदान शिबिरे घेणे असे अनेक कामे आरोग्यमित्र मार्फत करण्यात येणार आहेत.

 या अनुषंगाने नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या सूचनेवरून शिर्डी विभागाचे कामकाज करण्यासाठी श्री. विशाल मनोज भडांगे शिर्डी यांची ना. धनंजय मुंडे  आरोग्य मित्र म्हणून  नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रूग्णांनी त्यांना काही अडचणी असल्यास विशाल भडांगे (मो.नं.8657777791), प्रकाश गोंदकर (9595951491) सागर भिंगर्दीवे (8805569327), निखिल चांगले मो.7057781399)निलेश पठारे (9665637999) चेतन भडांगे (9595951659),  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment