तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

अभिनव विद्यालय येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित  अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे पुण्यश्लोक  अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जबदे व संस्थेचे सचिव परळी भूषण  साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सहशिक्षक सूर्यकांत आनकाडे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत आनकाडे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी माहिती सांगितली अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. आठ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.  भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. असे प्रतिपादन सूर्यकांत अनकाडे यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शत्रुघ्न भांगे यानी व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a comment