तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

आवर्षण व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 वैजनाथ (प्रतिनिधी) :-
       आवर्षण व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती कोणताही बडेजाव न करता हितचिंतक, मित्र व कार्यकर्त्यांनी वाढदिवस केवळ शाब्दिक शुभेच्छा देऊन साधेपणाने  करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी   यांनी केले आहे.
           ११ ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी  यांचा वाढदिवस आहे. मात्र आवर्षण व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. सद्य परिस्थितीत पाणीटंचाई आहे,
वाण प्रकल्प अद्याप कोरडा आहे,अवर्षणाचे मोठे  संकट निर्माण झालेले आहे, परळीतील शेतकरी अडचणीत  आहे . या परिस्थितीत खर्चिक व बडेजाव करून वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही. त्यामुळेहितचिंतक, मित्र व कार्यकर्त्यांनी वाढदिवस केवळ शाब्दिक शुभेच्छा देऊन साधेपणाने  करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी   यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment