तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

चित्रपट तारकांशी विवाह करणारे क्रिकेटपटू
भारताची जागतिक स्तरावर  चित्रपटांची सर्वात मोठी बाजारपेठ व क्रिकेटवेडयांचा देश अशी आहे असे सांगितल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. भारतात सिने कलावंत व  क्रिकेटपटूंना अफाट लोकप्रियता मिळते. याचा सरळ सरळ असा अर्थ निघतो की, या दोन क्षेत्रात भारतात फार मोठा ग्लॅमर आढळतो. दोन्ही क्षेत्रातील या ग्लॅमरस दुनियेत पैशाचा ओघ अफाट असल्याने या चित्रपटातील सौंदर्यासाठी क्रिकेटमधील पैशाचं सामर्थ्य सातासमुद्राचा अडथळा पार करून आल्याचे आपल्या लक्षात येईल. खास करून सिनेसृष्टीतील तारका क्रिकेटवीरांच्या गळ्यात वरमाला घातल्याचे जवळ जवळ आठ प्रसंग आपल्यासमोर विशद करत आहे.

                  भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या संगतीने यशस्वी झालेल्या " आराधना " या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटातील नायिका शर्मीला टागोरच्या प्रेमात भारतीय क्रिकेट संघाचा तत्कालिन कर्णधार व हैदराबादच्या नवाब घराण्याचा चिराग मन्सूर अली खान पडला. पुढे जाऊन सन १९६९ ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. लग्ना शर्मिलाने रितसर मुस्लिम धर्म स्विकारला. या धर्म परिवर्तना नंतर शर्मिला टागोर आयेशा सुलताना बनली. या दापंत्याला सैफ, सोहा व साबा हे तीन रत्ने झाले.

                भारतीय नटी रीना रॉय चक्क पाकिस्तानचा सलामीवीर मोहसीन खानच्या प्रेमपाशात गुरपटली. तिची "नागिण" देशभर  नावाजल्यानंतर तिची क्रेझ वाढली व त्याच  कालखंडात देखण्या मोहसिनचा क्रिकेटींग फॉर्म फणा काढून क्रिकेट जगतात मिरवत होता. त्याच तडाख्यात या दोघांची भेट झाली. सन १९८३ मध्ये या जोडप्याचं कायदेशीर निकाह होऊन मिलन झालं. या दरम्यान त्यांच्या कळपात एक मुलगीही आली. त्यानंतर या प्रेमवेडयांत तणाव पैदा झाला. त्यामुळे त्यांना वेगळे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. दोघांच्या फारकती नंतर मुलीचा ताबा मोहसिनकडे गेला परंतु मोहसिनने दुसरं लग्न करताच मुलीचा ताबा रीनाला मिळाला.

                     भारतीय चित्रपट सृष्टीतील सिनेतारका निना गुप्ता सन १९८० च्या सुमारास क्रिकेट जगतातील बादशहा गणला जाणारा वेस्ट इंडियन खेळाडू विव्हीयन रिचर्ड्सच्या प्रेमात पडली. " लिव्ह इन रिलेशनशिप " या गोंडस नावाच्या अनैतिक संबंधातून त्यांना मसाबा नावाचं कन्यारत्न झालं. पुढे जात त्यांनी लग्नही केलं नाही व रिचर्डसने मुलीला सांभाळण्यास असमर्थता दाखविली.  नीनाने तिची जबाबदारी समर्थपणे पार पाडून मसाबाचं यशस्वीपणे संगोपन केलं. या दरम्यान नीना मसाबासह मुंबईत राहायची तरी शक्य होईल तेव्हा रिचर्डसला भेटण्यास इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला जायची. हे तीन जीव एकत्र कायमस्वरूपी एकत्र राहात नव्हते तरी इतर कुटुंबियांप्रमाणे एकत्र सुट्टीचा आनंद घ्यायची संधी साधत आहेतच.

               या जोडीनंतर परत एकदा एक हैद्राबादी क्रिकेटर सिनेतारकेच्या मोहपाशात अडकला. संगिता बिजलानी त्या काळात चांगलीच चमकत असताना अझरच्या कुटुंबावर जोरदार कोसळली. त्यामुळे विवाहीत अझरच्या कुटुंबाच्या ठिकऱ्या झाल्या. सन १९९६ मध्ये पहिली पत्नी नौरीन ला तलाक दिला. त्यांनतर त्याच्या सोनेरी कारकिर्दीला " मॅच फिक्सिंगची " काळीमा लागली. सन २०१० मध्ये संगिता -अझहर यांचीही गाडी रुळावरून घसरली.

                भारतीय क्रिकेटचा विद्यमान कर्णधार विराट कोहली अभिनेत्री अनुष्का शर्माच्या जाळ्यात फसला. अनेक वर्ष त्यांनी मैत्रीचा खो खो खेळत ब्रेकअप - पॅचअप करत एकदाचा मेकअप करून घेत देशवासीयांना एकदाचा दिलासा दिला. एका शाम्पूच्या जाहीरातीसाठी प्रथम भेटलेली जोडी आता दमदार पणे आपला डाव पुढे नेत आहे. परंतु इतर क्रिकेटपटूंसारखा त्याचा डाव कुठपर्यंत चालतो हे पाहणे औत्सुक्याची बाब ठरणार आहे.

                 टर्बीनेटर म्हणून प्रसिद्ध असलेला फिरकी बहादर हरभजन सिंग फिल्म हिरॉईन गिता बसराच्या संगतीत गुंतला. सन २०१५ मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर सन २o१६ मध्ये हीनाया हीर ( मुलगी ) ने त्याच्या घरात पाळणा हलवला.  

             आपला पंजाब रणजी संघातला सहकारी हरभजनच्या पावलावर पाऊल ठेवत युवराज सिंगने सलमान खानच्या " बॉडीगार्ड " ची नायिका ब्रिटीश सुंदरी हेजल केजशी प्रेम करून लग्नाचा षटकार ठोकला. षटकार मारण्याचा विक्रम त्याने लग्नातही केला. चंदीगड, गोवा, दिल्ली या ठिकाणी मिळून सहा दिवस हा विवाह समारंभ चालू होता. म्हणजे लग्नातही तो षटकार मारण्यास विसरला नाही.

               विजयेंद्र घाडगे या जुन्या अभिनेत्याची कन्या व शाहरूख खानच्या " चक दे इंडिया " तील नायिका सागरिका घाडगे आणि क्रिकेटपटू झहीरखान यांनीही बऱ्याच दिवस प्रेमाच्या दुनियेत भटकणारी गाणी लग्नाच्या स्टेशनवर आणून सुखरूपपणे प्लॅटफॉर्मवर लावली आहे.

           लग्न कोणाशीही होवो. दोनाचे चार झाले. त्या चाराचेही वाढत जावो. परंतु ए

No comments:

Post a comment