तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

पत्रकारांना मारहाण प्रकरणी विविध पत्रकार संघटनेकडुन निषेध/ सेनगाव तहसिलला निवेदन(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव:- दि.12 आँगष्ट सोमवार रोजी हिंगोली शहरात काही समाजकंटकांनी कावड यात्रेवर दगडफेक करीत शहरात 50 वाहनावर दगडफेक करीत वाहानांची नासधुस केल्याने दंगल सदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती.याचे वार्ताकंन करण्यासाठी पत्रकार संतोष भिसे व प्रेस फोटोग्राफर निलेश गरवारे हे गेले असता पोलीसांनी दंगोलखोर ऐवजी या पत्रकारांना अमानुष मारहाण करुन त्यांच्याकडील कँमे-याची तोडफोड केल्याने या कृत्याचा सेनगाव तालुक्यातील विविध पत्रकार संघटनेकडुन निषेध करण्यात आला असुन आज दि.13 आँगष्ट मंगळवार रोजी सेनगाव तहसिलला निवेदन देण्यात आले आहे.
अधिक माहीती अशी की,दि.12 आँगष्ट सोमवार रोजी हिंगोली शहरात काही समाजकंटकांनी कावड यात्रेवर दगडफेक करीत दिसेल त्या वाहनावर दगडफेक करुन प्रचंड नुकसान केल्याने शहरात दंगल सदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती अशा बिकट परीस्थितीत ही आपला जीव धोक्यात घालुन पत्रकारांनी पत्रकारीतेचा धर्म म्हणुन जगासमोर घटनेची सत्य परीस्थिती उघड करण्याच्या प्रामाणिक हेतुने शहरभर वार्ताकंन करण्यासाठी पत्रकार शहराच्या विविध भागात फिरुन आढावा घेत होते.दरम्यान तापडीया इस्टेट भागात फिरुन आढावा घेत असतांना सकाळी सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान इ.टि.व्ही.भारत चे प्रतिनीधी संतोष भिषे व प्रेस फाेटो ग्राफर निलेश गरवारे आपल्या कँमे-यात शुटींग करीत असतांनी तेथे तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक काशिदे हे पत्रकारांना म्हणाले तुम्ही येथे कशाला आले? त्यावेळेस पत्रकारांनी त्यांच्याकडे असलेले पत्रकाराचे ओळख पत्र दाखविले.तरी ही त्यांनी पोलीसांना आदेश दिला की, कोनीही असो त्यांना सोडु नका त्यानंतर पत्रकार भिसे व गरवारे यांना पोलीसांनी अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली ही मारहाण ही एखाद्या दंगलखोरास करावी इतकी अमानुष होती.मारहाणी दरम्यान शुटींग करीत असलेला 70 हजार रुपयाचा कँमे-याची ही तोडफोड करण्यात आली.या कृत्याचा व संबधीत पोलीस अधिकारी व पोलीसांचा सेनगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,जिल्हा ग्रामिण पत्रकार संघ,अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने निषेध करीत दि.13 आँगष्ट मंगळवार रोजी सेनगाव तहसिलला निवेदन देण्यात आले असुन संबधीत पोलीसावर त्वरीत कठोर कारवाई करुन कँमेरा फोडल्याप्रकरणी 70 हजार रुपयाचे नुकसान देण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर अखिल भारतीय पत्रकार संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गोपालराव सरनाईक,ग्रामिण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ देशमुख,राजकुमार देशमुख,देविदास कुंदर्गे,बबन सुतार,विश्वनाथ देशमुख,गजानन वाणी,विठ्ठल देशमुख,केशव भालेराव,शेख खाजा,सिकंदर खाँ पठाण,शेख फारुक,जगन वाढेकर,शिवशंकर निरगुडे,गजानन देशमुख, बालाजी देशमुख, नितीन काळबांडे,गोवर्धन खंदारे,दिपक हराळ,बाळु आप्पा चाकोते,भास्कर कायंदे,ज्ञानेश्वर कांबळे,निलकंठ भादळकर,गजानन धुळधुळे आदीसह विविध पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment