तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

पालम येथील ममता विद्यालय येथे योग शिबिर संपन्न

अरुणा शर्मा


पालम :- ममता विद्यालयात येथे पतंजली योगा मार्फत लक्ष्मी खरात यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आलेल्या कार्याक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर.के. क्षिरसागर, सुपरवायझर सोपान कदम, योगा शिक्षक मोतीराम शिंदे, मधुकर येवले हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी योगाचे महत्व सागंण्यात आले. योग म्हणजे काय योगा का करावा, याचे फायदे, कोनती आसने योगा केल्याने आपल्या शरीरातील कोनती फायदे, कोनत्या आसनामुळे आपल्या शरीरातील कोनते अवयव दुखणे थांबते, निरोगी शरीर नियमित योग, भावी जीवनात निरोगी रहाने का गरजेचे आदि योग साधना बद्दल माहीती लक्ष्मीताई खरात यांनी सागीतली. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते दहावी सहा शे चाळीस मूले आणि मुली उपस्थित होते. योगासनाचे वीस आसने घेतली. विद्यार्थी यांचा उस्फूर्त प्रतिसाद होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूधाकर शेंडगे, शिवाजी आंबोरे, भगवान जाधव, आनंद जोमदे, बालाजी शिनगारे, भाऊसाहेब आवरगंड, गुडेवाड, आनत शेटे, मारलापल्ले मँडम, जयश्री कूरे, जान्ही जोशी, कूरे, उतम कांबळे, दतराव शेंगुळे, पंकज सपकाळे तुकाराम चौथाईवाले, प्रकाश आनक व शिक्षकांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन गोविंद पोळ यांनी केले. तर आभार आनंता खांडेकर यानी  मानले.

No comments:

Post a Comment