तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 30 August 2019

जिंतूर ता ब्राम्हणगाव येथे बैलाच्या धडकीने शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
जिंतूर तालुक्यातील चारठाणा या गावापासुन ८कीमीअंतरावर असलेल्या  मौजे ब्राह्मणगाव येथील आसाराम भाऊसिग राठोड वय ४८वर्षे यांचे  दि.३०वार शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या लाडक्या बैलांना बैल पोळा सणाच्या निमीत्ताने आज  पाण्याने धुत असताना बैलाने जबर धडक दिल्याने या घबराटने या धसकीने राठोड यांना हृदय विकाराच्या झटका आला यांना प्राथमीक उपचारासाठी  जिंतुर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले परंतु यावेळी ड्राक्टारानी राठोड यांना मृत घोषित केले आहे, यानंतर या रुग्णालयात शवविच्छेदन करुनचारठाणा पोलीस ठाण्याचे ब्राम्हणगाव बीट जमादार गुलाब भिसे यांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला आहे, या घटनेची नोंद चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे, 

यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, दोन मुले असा राठोड परीवार आहे. 

आसाराम भाऊसिग राठोड याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अकस्मात घडलेल्या घटनेमुळे   ब्राह्मणगाव येथे बैल  पोळा सणावर शोककळा पसरली आहे. आज बळीराजाच्या पोळा सणाच्या दिवशी ब्राम्हणगाव येथील शेतकरी मरण पावला यामुळे  येथील सर्व ग्रामस्थांनी आज बैल पोळा सण साजरा केला नाही. सर्व गावावर शोककळा पसरली आहे. 

No comments:

Post a comment