तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 30 September 2019

जिंतूरात कपबशी परत एकदा निवडणूक रंगवणार असे संकेतजिंतूर 
एकेकाळी अपक्ष म्हणून रामप्रसाद बोर्डीकर यांनी कपबशी निशाणी गाजवली तीच कपबशी पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे
भाजप सेना रासप या पक्षांच्या महा युती कडून मेघना बोर्डीकर यांना तिकीट मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे
तसे संकेत पण रासप नेते महादेव जानकर यांनी दिले आहेत 
असे झाल्यास कपबशी निशाणी पुन्हा एकदा निवडणुकीत दिसल्यास आश्चर्य नको

बिंगो पार्लरवर पोलीसांचा छापा ८८ हजारांचा एवज जप्त ; परळी शहर पोलिसांची कारवाईपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील मोंढा परिसरात असलेल्या जैन दुकानाच्या बाजूस रेणूका व्हिडीओ पार्लर मध्ये सुरु असलेल्या बिंगो जुगाराच्या पार्लरवर पोलीसांच्या विशेष पथकाने धाडटाकूण ८८५३८ रु.चा मुद्देमाल जप्त केला. 
शहरातील मोंढा परिसरातील जैन दुकानाच्या बाजूस असलेल्या रेणुका व्हिडीओ गेम पार्लरमध्ये परवाना संपल्यानंतरही बिंगोचा जुगार सुरु असलेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक चॉंद मेंडके, पो.कॉ.मुंडे, फड, स.पो.नि.एकशिंगे, यांनी या व्हिडीओ पार्लरवर अचानक छापा टाकला. यावेळी इलेक्ट्रॉनिक मशिनवर बिंगो जुगार सुरु असल्याचे दिसून आले. दुकानदार मालक व बिंगो खेडणार्‍यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील नगदी ३४८० रु. व ८५०५८ रु.चा मुद्देमाल जप्त केला. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वडसावित्रीनगर भागात हातभट्टी अड्डयावर धाड 16 हजाराचे रसायन जप्तपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
परळी शहरातील वडसावित्री नगर भागात सुरु असलेल्या हातभट्टी दारु अड्डयावर परळी शहर पोलिसांनी आज दि.29 रोजी सकाळी धाड टाकुन 16100 रु.चे रसायन जप्त केले.याप्रकरणी दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 शहरातील वडसावित्री नगर भागात हातभट्टी दारु उत्पादन होत असल्याची माहिती परळी शहर पोलिसांना मिळताच आज दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वा. पो.नि. कदम,रमेश तोटेवाड,चट्टे,लांडगे आदींच्या पथकाने धाड टाकली.यावेळी गुळमिश्रीत रसायनापासुन हातभट्टी दारु उत्पादन होत असल्याचे दिसुन आले.सदरील दारु उत्पादनासाठी लागणारे 16100 रुपयांचे  रसायन जप्त केले याप्रकरणी बळीराम जाधव व एकनाथ पवार यांच्याविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 65 (ई),65 (एफ),86 (1) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

परळी तालुक्यातील इंजेगाव येथे सुरू झाले मराठवाड्यातले पहिले कडकनाथ अंडी संकलन व विक्री केंद्रपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कृषीभुषण नाथराव कराड यांचा शेती उद्यो
नियमित नसणारा पाऊस, सतत पडणारा दुष्काळ यामुळे शेती संकटात आली आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. यावर मात करत परळी तालुक्यातील इंजेगाव येथे कृषीभूषण नाथराव निवृत्तीराव कराड यांनी मराठवाड्यातील पहिले कडकनाथ कोंबडीचे अंडी संकलन व विक्री केंद्र इंजेगाव येथे सुरू केले असून या अंड्याची देशभरात ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. या शेतीपुरक व्यवसायाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
परळी तालुक्यातील इंजेगाव येथील तरूण शेतकरी नाथराव कराड शेतीत सतत नवनवे प्रयोग करतात. या भागात सर्वप्रथम गटशेतीला त्यांनी सुरूवात केली. गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी संघटित करत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. कमी पाण्यात, रासायनिक खते, औषधाचा कमीत कमी वापर करून नैसर्गिक साधन सामुग्रीचा अधिकाधिक वापर करत पिकाच्या उत्पन्नावर भर दिला. दर्जेदार व विक्रमी शेतीचे उत्पादन घेत गटशेती व आधुनिक शेतीची चळवळ उभी केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक शेतकरी या चळवळीत सहभागी केले. त्यांच्या या कार्याची दखल राज्य सरकारने घेतली. त्यांचा 2013 ला ‘कृषीभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला.
अलिकडच्या काळात कमी होत चाललेला पाऊस, त्याचा नसलेला नियमितपणा, खोल-खोल जात असलेला जलसाठा, शेतमालाला नसलेला भाव, वाढता उत्पादन खर्च, प्रतिकूल हवामान अशा सार्‍या गोष्टीमुळे आज शेती व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी उध्दवस्त होत चाललेला आहे. शेतीवर आलेल्या संकटावर मात करत नाथराव कराड यांनी त्यांच्या परळी तालुक्यातील इंजेगाव येथील शेतात कडकनाथ कोंबडीचे मराठवाड्यातील पहिले अंडी संकलन केंद्र सुरू केले आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या केंद्राला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दिवसेंदिवस अंड्याची मागणी वाढत चालली आहे. अंड्याची देशभरात व परदेशातही ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. हजारो रूपयांची उलाढाल या शेतीपुरक व्यवसायातून येथे होते आहे. सुमारे पंधरा लाख रूपयांची गुंतवणूक करून श्री कराड यांनी हा व्यवसाय उभारला आहे.
अलिकडच्या काळात मोठी मागणी असलेल्या कडकनाथ कोंबडे, या कोंबड्याची अंडी, पिल्ले याला बाजारात मोठी किंमत द्यावी लागते. कडकनाथ कोंबड्याचे कुकूट पालन करण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय श्री कराड यांनी घेतला. याबाबत विविध ठिकाणी भेटी दिल्या. बाजारपेठेचा अभ्यास केल्यानंतर वर्धा येथून सुमारे दीड हजार कोंबड्या आणल्या. एका कोंबडीला चारशे ते 500 रूपये त्यांना मोजावे लागले. या कोंबड्यासाठी अद्ययावत शेड त्यांनी आपल्या शेतात उभे केले. या कोंबड्याना लागणार्‍या अन्नाचे उत्पादन व त्यावरची प्रक्रिया त्यांनी आपल्या शेतातच स्वतः सुरू केली. दोन महिन्यापासून अंड्याची विक्री सुरू झाली आहे. या कोंबड्यापासून दररोज सहाशे ते आठशे अंडी उत्पादित होतात. कडकनाथ कोंबडीचे अंडे आरोग्यदायी, चवदार आहेत. त्यातील पोषक घटकामुळे स्नायू वाढीस, हाडे मजबूत होण्यास, लठ्ठपणा टाळण्यास, स्त्रीयांची मासिक पाळी नियमित ठेवण्यास, लहान मुलांच्या वाढीस ते उपयुक्त असल्यामुळे या अंड्याना किंमतही चांगली मिळते व त्यांना मागणीही मोठी असते असे श्री कराड सांगतात. बेंगलोर येथील अन्न परीक्षण संशोधन संस्थेत कडकनाथ कोंबडीची अंडी व मांस यावर संशोधन झाले असून ही अंडी व मांस विविध आजारावर उपयुक्त असल्याचे या संस्थेने संशोधनातून जाहीर केले असल्याचे श्री कराड यांनी सांगितले. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नगर, लातूर, नांदेड, परभणी, परळी आदी ठिकाणी ही अंडी विक्रीला जात असून ठोक बाजारात डझनाला एकशे ऐंशी ते दोनशे रूपये भाव मिळतो आहे. किरकोळ बाजारात विक्रेते तीनशे रूपये डझन या भावाने याची विक्री करत आहेत. हा शेतीपूरक व्यवसायाचे स्वरूप वाढवून त्यांनी वैजनाथ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या कृषी उद्योगाचे रजिस्ट्रेशन करून या उद्योगामार्फत या अंड्याची आता ऑनलाईन विक्रीही श्री कराड यांनी सुरू केली आहे. यासाठी आकर्षक पॅकींग करून अंडी विक्रीला पाठवले जात आहेत. सुमारे तीस जणांना यातून रोजगार मिळाला आहे. महिन्याला दीड लाख रूपयांचे उत्पन्न सध्या होत असून महिन्याचा उत्पादन खर्च ऐंशी हजार रूपये असल्याचे श्री कराड यांनी सांगितले. शेतीवरील संकटांना धरून न बसता असे पुरक व्यवसाय केल्यास शेतकर्‍यांच्या जीवनात पुन्हा आर्थिक क्रांती निर्माण होण्यास मदत होईल असे श्री कराड यांनी सांगितले. दरम्यान श्री कराड यांची इंजेगाव शिवारात वीस एक्कर शेतजमीन आहे. या शेतजमीनीत वडीलोपार्जित विहिर आहे. पण विहिरीचे पाणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने पीकाला पाणीपुरवठा करणे अवघड होवून बसले. त्यामुळे उ

परळी पं.स.चे संजय केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
 पंचायत समिती परळी वैजनाथचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा  वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याता आला.
         गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा आज दि.30 सप्टेंबर रोजी परळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्ताने शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते राजेश गित्ते, मालेवाडीचे सरपंच भुराज बदने, नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे, जिरेवाडीचे गोवर्धन कांदे, माजी जि.प.सदस्य संजय गिराम, माणिक कडबाणे आदींनी वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या आज सोमवार,दि.30 सप्टेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्ताने शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नंदनजचे ग्रा.सदस्य तथा युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय आघाव, वैजनाथ माने, आशिष डोळे, प्रविण गुट्टे आदींनी वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

बीडच्या राकाॕ.महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्या गाडीचा अपघात; संगिता तुपसागर गंभीर जख्मी

 वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राष्ट्रवादी काॕग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे बीडच्या राकाॕ.महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर या मुंबईला गेल्या होत्या मुंबईहुन धारुर कडे येत असताना त्यांच्या गाडीला समोरुन धडक बसल्यामुळे मोठा अपघात झाला त्यामध्ये संगिता तुपसागर व चालक गंभीर जख्मी झाले असुन लातुर येथील फुलाबाई बनसोडे हाॕस्पिटल येथे उपचार चालु आहे.
सविस्तर माहिती अशी आहे कि,राष्ट्रवादी काॕग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे बीडच्या राकाॕ.महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर या मुंबईला गेल्या होत्या मुंबई येथील सर्व कामकाज अटपुन शनिवारी गावाकडे येत असताना तेलगाव ते धारुर रोडवर राञी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक समोरुन ट्रकने समोरासमोर धडक दिली त्यामध्ये बीडच्या राकाॕ.महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर व चालक भुजंग हे गंभीर जख्मी होऊन गाडीचा समोरचा भाग चेदांमेदा झाला आहे.संगिता तुपसागर यांच्या हाताला गंभिर मार लागल्याने खंद्याचे मोठे आॕपरेशन करावे लागले आहे चालक भुजंग यांच्या डोक्याला आणी तोंडालाही मार लागला आहे सध्या लातुर येथील फुलाबाई बनसोडे हाॕस्पिटल येथे उपचार चालु असुन प्रकृती चांगली आसल्याचे समजते आहे.

मिसेस, मिस आणि मिस्टर भारत आयकॉन पेजंट येथे स्मिता ठाकरे, अनुप जलोटा आणि मुकेश ऋषी उपस्थित होतेमुंबई (प्रतिनिधी) :- अखिल बन्सल जे इंडिया आयकॉनचे सीएमडी आहेत, त्यांनी सांताक्रूझ मधील सहारा स्टार हॉटेलमध्ये मिसेस / मिस / मिस्टर भारत आयकॉन स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यात कॉर्पोरेट जगातील लोक, चित्रपट आणि टीव्ही मधील लोक आमंत्रित होते. मिसेस / मिस / मिस्टर प्रकारात मॉडेलला एकत्र व्यासपीठ मिळवून देणारी ही पहिली स्पर्धा आहे. डिझाइनर रियाज गंगाजी, अर्चना कोचर, तस्लेम मर्चंट, जागृती विक्रम, संजना जॉन, अनुष्का रमेश, मानसी ढोवळ, रेखा राणा, मिताली नाग, स्मिता ठाकरे, अनूप जलोटा, जसलीन मथारू, जॉर्जिया अँड्रिया, मिकी मेहता, मुकेश ऋषी, पंकज बेरी मोरानी, कृष्का लुल्ला, शगुन गुप्ता, सुनील पाल यांच्यासह अनेक पाहुणे या स्पर्धेत सहभागी झाले होते. अक्षयसिंग ठाकूर यांनी मिस्टर भारत आयकॉनची पदवी जिंकली, तर लव्हनेश सोबती प्रथम धावपटू व कलासेल्वम द्वितीय धावपटू ठरला. मिस वर्गात अर्चना भावसारने विजेतेपद पटकावले, तर नम्रता नहार प्रथम धावपटू तर पारुल शर्मा द्वितीय धावपटू ठरली. मिसेस प्रकारात प्रथमच सोनाली गुप्ता आणि नंदिनी गुप्ता असे दोन विजेते होते. रितू कटारिया व सुनीता आचार्य प्रथम उपविजेते तर परी मेहता व रश्मी हरिहिमो द्वितीय धावपटू ठरल्या. गायक प्रिती भल्ला आणि विशाल कोठारी यांनी थेट सादर केले तर सूरतच्या ताला नृत्य समूहानेही आश्चर्यकारक प्रदर्शन केले. लव्हल प्रभु या स्पर्धेचे शो दिग्दर्शक होते.

परळीत 43 जणांनी घेतले 66 अर्जपरळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज दि.27 सप्टेंबर पासुन सुरुवात झाली असुन चौथ्या दिवशी 44 अर्ज घेतले असुन आत्तापर्यंत 43 जणांनी 66 अर्ज घेतले आहेत.अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.प्रमुख संभाव्य उमेदवार असलेले ना.पंकजा मुंडे या दि.4 ऑक्टोबर व धनंजय मुंडे हे दि.3  ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. 
 विधानसभा निवडणुक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रशासकीय इमारतीत निवडणुक कक्ष स्थापन करण्यात आला असुन निवडणुक निर्णय अधिकारी गणेश महाडीक,सहाय्यक निवडणुक अधिकारी तहसिलदार विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे निवडणुक प्रक्रिया पार पाडत आहेत अर्ज भरावयाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिनिधीसह 16 जणांनी 22 अर्ज खरेदी मध्यंतरी शनिवार व रविवारची सुट्टी होती.आज सोमवारी 44 अर्जांची विक्री झाली.आजपर्यंत एकुण 43 जणांनी 66 अर्ज घेतले आहेत.

भारत व द. आफ्रिका कसोटी मालिकांवर एक नजर           विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा हिस्सा असलेली द. आफ्रीका व भारत यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची     " गांधी मंडेला " मालिका येत्या २ ऑक्टोबर पासून विशाखापट्टण येथील सामन्याने सुरुवात होत असून उर्वरीत दोन कसोटी पुणे व रांची येथे होणार आहे. सन १९९२ पासून या दोन देशात कसोटी मालिका नियमितपणे खेळल्या जाऊ लागल्या असून या सर्व मालिकांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेने भारतावर कुरघोडी केल्याचेच चित्र स्पष्ट दिसते. एकंदर ३६ कसोटीत हे दोन देश आपसात भिडले असून १५ मध्ये दक्षिण आफ्रिका व ११ सामन्यात भारताने यश मिळविले आहे,  तर उरलेल्या १० सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात झालेल्या १६ कसोटीपैकी ८ भारताने तर ५ आफ्रिकेने जिंकले. तर ३ सामने अनिर्णित राहीले. दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकेने १० तर भारताने ३ कसोटी सामने जिंकले. उर्वरीत ७ सामने निकालाविना संपले. भारताने द. आफ्रिकेत ३ कसोटया जिंकल्या असल्या तरी तेथे कसोटी मालिका जिंकण्यात भारताचा आजवरचा कोणताही संघ यशस्वी झाला नाही. भारत आतापर्यंत फक्त द. आफ्रिकेतच कसोटी मालिका जिंकू शकला नाही. या कट्टर प्रतिस्पर्ध्यात एकूण १३ मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यातील ७ आफ्रिकेने तर ३ भारताने जिंकल्या. ३ मालिका अनिर्णित राहिल्यात. एकंदर भारताची द. आफ्रिकेतील कामगिरी निराशाजनकच राहीली आहे.

                  दोन्ही संघातील फलंदाजांच्या वैयक्तीक सर्वाधिक धावांचा विचार केला तर भारताचा आक्रमक सलामीवीर विरेंद्र सेहवागने चेन्नईत सन २००८ मध्ये केलेल्या ३१९ धावा या सर्वोच्च आहेत, तर दक्षिण आफ्रिकेकडून हा मान हाशिम आमलाला जातो. त्याने नागपूर कसोटीत २५३ धावांची खेळी साकारली होती.

                 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात भारताची सर्वाधिक धावसंख्या आहे ६ बाद ६४३. सन २०१० मध्ये कोलकाता कसोटीत भारताने हा उच्चांक प्रस्थापित केला. तर भारताविरूध्द सन २०१० मध्येच दक्षिण आफ्रिकेने आपली एका डावातली सर्वाधिक धावसंख्या रचली. सेंच्युरियन कसोटीत आफ्रिकेने ४ बाद ६२० धावांचा डोंगर उभारला होता.

                 सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत भारताचा अनिल कुंबळे आघाडीवर असून त्याने २१ सामन्यात ८४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला, तर दक्षिण आफ्रिकेकडून हा सन्मान वेगवान गोलंदाज डेल स्टेनला जातो. त्याने १४ सामन्यात ६५ भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविली आहे. एका सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्यात भारताकडून रविचंद्रन आश्विन तर आफ्रिकेकडून अॅलन डोनाल्डने बाजी मारली आहे. दोघांनीही प्रत्येकी १२ बळी आपल्या झोळीत टाकले आहेत.

              या दोन देशातील मालिकांना मैत्री चषकाचा मुलामा असला तरी यांच्यातील सामने जितके रंगतदार झाले तितकेच वादग्रस्तही झाले आहे. याबाबत मागील काही लेखांमध्ये आपण आढावा घेतला आहेच. परंतु सदरची मालिका ही भारतात खेळली जाणार असून भारतातील आखाडा खेळपट्टयांचे मोठे आव्हान पाहुण्या संघासमोर असणार आहे. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टयांवर आफ्रिकन फलंदाजांना मोठी कसरत करावी लागणार असून भारताचा वेगवान माराही पूर्वीच्या तुलनेत भेदक बनला असून आफ्रिकन फलंदाजांना या फार मोठया आग्निदिव्यातून जावे लागणार आहे. 

                 अशीच काहीशी भारताची परिस्थिती आहे. कसोटी विश्व क्रमवारीत भारत अव्वल असला तरी भारताची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे कागदावर मजबूत दिसणारी फलंदाजी होय !  महत्वाच्या क्षणी कचखाऊपणा दाखविण्यात आपले कागदी वाघ कुप्रसिद्ध असल्याने आफ्रिकेचे गोलंदाज भारताला बॅकफूटवर ढकलू शकतात. त्यामुळे वरकरणी फलंदाजांचा दिसणारा हा खेळ गोलंदाजांना हिरो बनवू शकतो.

                  भारत या मालिकेत बाजी मारून आपली गुणसंख्या वाढवू शकतो. परंतु त्यासाठी फलंदाजांबरोबरच संघ व्यवस्थापन व खास करून कर्णधार कोहली संघ कसा निवडतो, हाताळतो यावरच बरच काही अवलंबून आहे. तसेच समोरच्याला कमी लेखण्याची आपली नेहमीची सवय टाळणे गरजेचे आहे.


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२८२.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई मुंबईत ३ लाख ९१ हजारांचे बनावट मद्य व मुद्देमाल जप्त


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई,  : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वडाळा येथे एका व्यक्तीस अटक केली असून अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या  ठिकाणी  छापा टाकून एकूण 3 लाख 91 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उप-आयुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा, अधीक्षक सी.एच.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने वडाळा येथे नुकतेच बनावट मद्य पुरविणाऱ्या इसमास ताब्यात घेतले.
हा इसम समाजमाध्यमांद्वारे महाविद्यालयीन तरूणांना घरपोच सेवा देणारे संदेश पाठवत असे. विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे हलक्या प्रतीचे मद्य टाकून वितरित करत असे. या मद्याची पॅकिंग तो स्वत: करीत होता, त्याच्या वाशी येथील घरी उच्च प्रतीच्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, लेबल, पॅकिंगचे सामान व हलक्या प्रतीचे मद्य जप्त करण्यात आले.
या कार्रवाईत मुंबई शहरचे निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक अजय बगाटे, दुय्यम निरीक्षक विनोद शिंदे, जवान भालचंद्र सकपाळ, जनार्दन पवार, सदानंद कांबळे इत्यादिंनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक विलास बामणे करीत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाच्या आणि मद्याच्या वापराला आळा घालण्याचे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधू महाजन, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत आहेत.

भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यात २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, : विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आयएएस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी १ सर्वसाधारण निरीक्षक काम बघतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आयपीएस (इंडियन पोलीस सर्व्हिस) दर्जाचे ४१ पोलीस निवडणूक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रत्येक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त कार्यक्षेत्राला १ याप्रमाणे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
उमेदवार आणि पक्षांच्या निवडणूकविषयक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) दर्जाचे ११२ खर्चविषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी हे निरीक्षक काम बघतील. निवडणुकीतील अवैध खर्च रोखण्याच्या दृष्टीने यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय आयोगाकडून राज्यस्तरावर अशा २ विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. त्या अनुषंगाने ६ विभागीय आयुक्तांना सुलभ निरीक्षक (Accessible Observer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मतदान कालावधीत सोयी-सुविधा उपलब्ध करणे, त्यांची मतदार नोंदणी तसेच प्रत्यक्ष मतदान वाढविणे यासाठी करण्यात येणाऱ्या कामांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी हे सुलभ निरीक्षक काम करणार आहेत.

राज्यात १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई,  : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- 2 मतदारसंघात 3 उमेदवार, नांदेड- 5 मतदारसंघात 15 उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी- 2 मतदारसंघात 6 उमेदवार, जालना- एका मतदारसंघात 2 उमेदवार, औरंगाबाद- 4 मतदारसंघात 8 उमेदवार, नाशिक- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात 5 उमेदवार, पुणे- 7 मतदारसंघात 8 उमेदवार, अहमदनगर- 5 मतदारसंघात 9 उमेदवार, बीड- 4 मतदारसंघात 9 उमेदवार, लातूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार, सोलापूर- 2 मतदारसंघात 2 उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

राज्यात मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, भानिवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशा सूचना दिल्या आहेत. मतदान २१ ऑक्टोबर रोजी आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
संबंधित नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे. सर्व संबंधित घाऊक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांना या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित अनुज्ञप्तीधारक या निर्देशाचे कडक पालन करतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच आवश्यकता असल्यास संशयित अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्त्या मतदान संपण्याच्या ४८ तास अगोदर सीलबंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. निवडणुकीचे कोरडे दिवस हे सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य विक्रेते अनुज्ञप्तीधारकांना लागू आहेत. तसेच विशेष कार्यक्रमासाठी देण्यात येणाऱ्या एक दिवसीय अनुज्ञप्तींसाठीसुद्धा हे कोरडे दिवस लागू आहेत. निवडणुकी दरम्यानच्या या कोरड्या दिवसांना कोणत्याही अनुज्ञप्तीधारकास कोणत्याही बाबीसाठी सवलत नाही, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त तसेच अधीक्षक यांना दिल्या आहेत.

मतदारांच्या सहाय्यासाठी ‘सी व्हिजील’, ‘व्होटर्स हेल्पलाईन’, ‘पीडब्ल्यूडी’ ॲप

 राऊत प्रतिनिधी
मुंबई,  : मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजील’ या ॲप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पीडब्ल्यूडी’ व ‘व्होटर्स हेल्पलाईन’  ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही तीनही ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार थेट भारत निवडणूक आयोगाकडे करता येते. निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या खोट्या बातम्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, मतदारांना पैशाचे वितरण, मद्य अथवा मादक पदार्थांचे वितरण, शस्त्रांचे अवैध प्रदर्शन, धाकदपटशा, सांप्रदायिक द्वेषयुक्त भाषण, पैसे देऊन छापलेली बातमी (पेड न्यूज), वस्तूंचे मोफत वितरण, विनामूल्य वाहतूक सेवा आदी बाबींची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजील’ या प्रभावी ॲपचा वापर करू शकतात. एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळून आल्यास त्याचे छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून ते या ॲपवर अपलोड करता येते. या तक्रारीची दखल निवडणूक आयोग घेत असते.
या निवडणुकीत  दिव्यांग नागरिकांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी pwd हे ॲप विकसित केले आहे. याद्वारे दिव्यांग व्यक्ती म्हणून सुलभतेने नोंद करता येते, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावाचे हस्तांतरण, मतदार यादीतील नावामध्ये सुधारणा अथवा नाव वगळणे, व्हिलचेअरसाठी विनंती, मतदान केंद्र शोधणे, अर्जाची स्थिती पाहणी आदी बाबीही सुलभ होतील.
‘व्होटर्स हेल्पलाईन’ या ॲपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणे, नवीन अर्ज अथवा यादीतील नावाचे हस्तांतरण सहज शक्य होते. निवडणूक सेवाविषयक तक्रारी नोंदविता येतात व त्याची स्थिती समाजवून घेता येते. मतदान, निवडणूक, इव्हिएम, निकाल यासंदर्भातील शंकांचे निरसन, निवडणुकांचे वेळापत्रक, उमेदवारांची माहिती, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आदी माहिती या ॲपवर मिळू शकते. मतदानानंतर सेल्फी अपलोड करण्याची सुविधाही यामध्ये आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९;जिल्‍हयात आज ६ उमेदवारांनी केले नामनिर्देशन पत्र दाखलप्रतिनिधी
परभणी, दि. ३० :-  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्‍हयात आज दि. ३० सप्‍टेंबर अखेरपर्यंत एकूण ६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मतदार संघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ९५-जिंतूर -निरंक, ९६-परभणी - ५, ९७-गंगाखेड - १ आणि ९८-पाथरी –निरंक. विधानसभा मतदारसंघात आज अखेर एकूण २७३  नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये ९५-जिंतूर - ४३, ९६-परभणी - ८८, ९७-गंगाखेड - ११२ आणि ९८ – पाथरी - ३० असे आज अखेरपर्यंत एकूण २७३ नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९;या उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
प्रतिनिधी
परभणी, दि. ३० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने  ९६- परभणी  मतदारसंघासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्‍या पाच उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे गोविंद (भैय्या)रामराव देशमुख पेडगावकर (अपक्ष्‍ा), अॅड. अफजल बेग सहाब (अपक्ष), अब्‍दुल सत्‍तार अब्‍दुल अजीज शेख (इनामदार) (अपक्ष), कौसडीकर निहाल अहेमद कौसडीकर खाजामियॉ (अपक्ष), शेख शकुर शेख ईस्‍माईल (अपक्ष) तसेच ९७-गंगाखेड या मतदार संघासाठी आज सिताराम चिमाजी घनदाट (अपक्ष) या उमेदवारांने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. असे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

गंगाखेड विधानसभा शिवसेने कडे उमेदवारी विशाल कदम यांना मिळताच पालम शहरात फटाके फोडून आनंद साजरा

अरुणा शर्मा
----------------

 पालम :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला स्थान देण्यात आले.
जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुंबई येथील मातोश्री निवासस्थानावर दि. 30 सप्टेबर रोजी दुपारी 2:30 वाजता एबी फॉर्म हाती घेतला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे पहिल्या पासूनच शिवसेना गंगाखेड विधानसभा मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्नात होते. पालम शहरात शिवसेना तालुका प्रमुख हनूमंत पौळ व शहर अघ्यक्ष गजानंद पवार युवासेना तालुका प्रमुख, ओकार सिरस्कर, यांच्या मार्गदर्शना खाली पालम चौकात फटाके फोडून आनंद साजरा केला यावेळी तालूक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मारहाण केल्या प्रकरणी एकाजनावर गुन्हा दाखलअरुणा शर्मा
----------------

  पालम :- तालुक्यातील मौजे फळा हे गाव ब्रम्हीभूत श्री संत मोतीराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव असून या गावात संत  मोतीराम महाराज यांची संजीवनी समाधी आहे त्यामुळे हे गाव एक धार्मिक व भावीक गाव म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे या ठिकाणी दरदिवशी सांप्रदायिक व धार्मिक कार्यक्रम चालू असतात असेच या ठिकाणी इच्छुकांना सांप्रदायिक वारकरी शिक्षण देण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था चालू आहे असेच या ठिकाणी कार्यरत असलेल्या श्री सदाशिव निवृत्ती पौळ यांची एक वारकरी शिक्षण संस्था आहे या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दररोज सकाळ व संध्याकाळी भजन कीर्तन वादन गायनाचे धडे दिले जातात व त्यामुळे या संस्थेचे विद्यार्थी दरदिवशी प्रमाणें भजन कीर्तन व मृदंग वादनासह गायन करत आपला नित्य पाठ करण्यात मग्न होते त्यावेळी गावातील श्री बाळू मोतीराम पौळ हा दिनांक 29 सप्टेंबर 2019 रोजी दारू पिऊन या ठिकाणी आला व विनाकारण आपल्या नित्य पाठात मग्न असलेल्या मुलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या विटांच्या तुकड्यांनी जबर मारहाण केली असता या मारहाणीत चार मुले  जखमी झाली असल्याने श्री सदाशिव निवृत्ती पौळ यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरोन आरोपी बाळू मोतीराम पौळ याच्या विरोधात गु. र. 195/2019 भा.द.वी.कलम 324, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी पूढील तपास पोलीस निरीक्षक श्री एस.के.माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. श्री ए. एन. फड हे करीत आहेत

परळी तालुक्यातील इंजेगाव येथे सुरू झाले मराठवाड्यातले पहिले कडकनाथ अंडी संकलन व विक्री केंद्रपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कृषीभुषण नाथराव कराड यांचा शेतीपुरक उद्योग
नियमित नसणारा पाऊस, सतत पडणारा दुष्काळ यामुळे शेती संकटात आली आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. यावर मात करत परळी तालुक्यातील इंजेगाव येथे कृषीभूषण नाथराव निवृत्तीराव कराड यांनी मराठवाड्यातील पहिले कडकनाथ कोंबडीचे अंडी संकलन व विक्री केंद्र इंजेगाव येथे सुरू केले असून या अंड्याची देशभरात ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. या शेतीपुरक व्यवसायाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
परळी तालुक्यातील इंजेगाव येथील तरूण शेतकरी नाथराव कराड शेतीत सतत नवनवे प्रयोग करतात. या भागात सर्वप्रथम गटशेतीला त्यांनी सुरूवात केली. गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी संघटित करत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. कमी पाण्यात, रासायनिक खते, औषधाचा कमीत कमी वापर करून नैसर्गिक साधन सामुग्रीचा अधिकाधिक वापर करत पिकाच्या उत्पन्नावर भर दिला. दर्जेदार व विक्रमी शेतीचे उत्पादन घेत गटशेती व आधुनिक शेतीची चळवळ उभी केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक शेतकरी या चळवळीत सहभागी केले. त्यांच्या या कार्याची दखल राज्य सरकारने घेतली. त्यांचा 2013 ला ‘कृषीभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला.
अलिकडच्या काळात कमी होत चाललेला पाऊस, त्याचा नसलेला नियमितपणा, खोल-खोल जात असलेला जलसाठा, शेतमालाला नसलेला भाव, वाढता उत्पादन खर्च, प्रतिकूल हवामान अशा सार्‍या गोष्टीमुळे आज शेती व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी उध्दवस्त होत चाललेला आहे. शेतीवर आलेल्या संकटावर मात करत नाथराव कराड यांनी त्यांच्या परळी तालुक्यातील इंजेगाव येथील शेतात कडकनाथ कोंबडीचे मराठवाड्यातील पहिले अंडी संकलन केंद्र सुरू केले आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या केंद्राला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दिवसेंदिवस अंड्याची मागणी वाढत चालली आहे. अंड्याची देशभरात व परदेशातही ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. हजारो रूपयांची उलाढाल या शेतीपुरक व्यवसायातून येथे होते आहे. सुमारे पंधरा लाख रूपयांची गुंतवणूक करून श्री कराड यांनी हा व्यवसाय उभारला आहे.
अलिकडच्या काळात मोठी मागणी असलेल्या कडकनाथ कोंबडे, या कोंबड्याची अंडी, पिल्ले याला बाजारात मोठी किंमत द्यावी लागते. कडकनाथ कोंबड्याचे कुकूट पालन करण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय श्री कराड यांनी घेतला. याबाबत विविध ठिकाणी भेटी दिल्या. बाजारपेठेचा अभ्यास केल्यानंतर वर्धा येथून सुमारे दीड हजार कोंबड्या आणल्या. एका कोंबडीला चारशे ते 500 रूपये त्यांना मोजावे लागले. या कोंबड्यासाठी अद्ययावत शेड त्यांनी आपल्या शेतात उभे केले. या कोंबड्याना लागणार्‍या अन्नाचे उत्पादन व त्यावरची प्रक्रिया त्यांनी आपल्या शेतातच स्वतः सुरू केली. दोन महिन्यापासून अंड्याची विक्री सुरू झाली आहे. या कोंबड्यापासून दररोज सहाशे ते आठशे अंडी उत्पादित होतात. कडकनाथ कोंबडीचे अंडे आरोग्यदायी, चवदार आहेत. त्यातील पोषक घटकामुळे स्नायू वाढीस, हाडे मजबूत होण्यास, लठ्ठपणा टाळण्यास, स्त्रीयांची मासिक पाळी नियमित ठेवण्यास, लहान मुलांच्या वाढीस ते उपयुक्त असल्यामुळे या अंड्याना किंमतही चांगली मिळते व त्यांना मागणीही मोठी असते असे श्री कराड सांगतात. बेंगलोर येथील अन्न परीक्षण संशोधन संस्थेत कडकनाथ कोंबडीची अंडी व मांस यावर संशोधन झाले असून ही अंडी व मांस विविध आजारावर उपयुक्त असल्याचे या संस्थेने संशोधनातून जाहीर केले असल्याचे श्री कराड यांनी सांगितले. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नगर, लातूर, नांदेड, परभणी, परळी आदी ठिकाणी ही अंडी विक्रीला जात असून ठोक बाजारात डझनाला एकशे ऐंशी ते दोनशे रूपये भाव मिळतो आहे. किरकोळ बाजारात विक्रेते तीनशे रूपये डझन या भावाने याची विक्री करत आहेत. हा शेतीपूरक व्यवसायाचे स्वरूप वाढवून त्यांनी वैजनाथ अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या कृषी उद्योगाचे रजिस्ट्रेशन करून या उद्योगामार्फत या अंड्याची आता ऑनलाईन विक्रीही श्री कराड यांनी सुरू केली आहे. यासाठी आकर्षक पॅकींग करून अंडी विक्रीला पाठवले जात आहेत. सुमारे तीस जणांना यातून रोजगार मिळाला आहे. महिन्याला दीड लाख रूपयांचे उत्पन्न सध्या होत असून महिन्याचा उत्पादन खर्च ऐंशी हजार रूपये असल्याचे श्री कराड यांनी सांगितले. शेतीवरील संकटांना धरून न बसता असे पुरक व्यवसाय केल्यास शेतकर्‍यांच्या जीवनात पुन्हा आर्थिक क्रांती निर्माण होण्यास मदत होईल असे श्री कराड यांनी सांगितले. दरम्यान श्री कराड यांची इंजेगाव शिवारात वीस एक्कर शेतजमीन आहे. या शेतजमीनीत वडीलोपार्जित विहिर आहे. पण विहिरीचे पाणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने पीकाला पाणीपुरवठा करणे अवघड होवून बसले. त्यामुळे उ

परळी पं.स.चे संजय केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
 पंचायत समिती परळी वैजनाथचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा  वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याता आला.
         गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा आज दि.30 सप्टेंबर रोजी परळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्ताने शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते राजेश गित्ते, मालेवाडीचे सरपंच भुराज बदने, नंदनजचे सरपंच अनिल गुट्टे, जिरेवाडीचे गोवर्धन कांदे, माजी जि.प.सदस्य संजय गिराम, माणिक कडबाणे आदींनी वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या आज सोमवार,दि.30 सप्टेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्ताने शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नंदनजचे ग्रा.सदस्य तथा युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय आघाव, वैजनाथ माने, आशिष डोळे, प्रविण गुट्टे आदींनी वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गात्सवाची उत्साहात अँड.गोविंद फड यांच्या हस्ते स्थापना
फेस्टीवलमध्ये समाज उपयोगी व धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन ; पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा-माधव मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे हाळम येथे ग्रामीण भागात गेल्या 12 वर्षांपासून बीड जिल्ह्यातील एकमेव पहिलाच हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गात्सवात दुर्गादेवीची मुर्तीची उत्साहात स्थापना  करण्यात येते. आज सायंकाळी 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड यांच्या शुभहस्ते स्थापना होऊन आरती व देवीची विधिवत पुजा करून दुर्गादेवीची घटस्थापना करण्यात आली. अशी माहिती  हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक तथा ग्रामपंचायत सदस्य माधव मुंडे यांनी दिली. तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले. 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, हाळम फेस्टीवलच्या सार्वजनिक दुर्गादेवीच्या महोत्सवास दि.29 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला असुन  प्रतीवर्षो प्रमाणे याहीवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी 5 वाजता वाजत गाजत दुर्गामाता देवीच्या मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुर्गोदेवीच्या मुर्तीची दि.29 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड यांच्या शुभहस्ते आरती देवीची विधिवत पुजा करुन स्थापना करण्यात आली.  29 सप्टेंबर रोजी स्थापने पासुन ते 8 ऑक्टोंबर विसर्जना पर्यंन्त हाळम फेस्टिव्हलच्या माध्यमातुन अनेक कार्यक्रमांची नागरिकांना मेजवानी मिळणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळाची भयानक दाहकता असल्यामुळे  जिल्ह्यात पाऊस पडू दे, शेतकरी राजाला सुखी ठेव, सर्वांना सुखी समाधानी ठेव, दुष्काळाचे सावट दूर व्हावे अशी प्रार्थना देवीकडे फड यांनी भक्तीभावे केली. यावेळी माधव मुंडे यांच्या हस्ते फड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
          गेल्या 12 वर्षापासुन हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गा महोत्सव परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिला सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा एकमेव सांस्कृतिक महोत्सव साजरा होत असतो. या महोत्सवात दुर्गोत्सव स्थापने पासून ते विसर्जन मिरवणुकी पर्यंत विविध कार्यक्रम आयोजन केले जाते. तसेच फेस्टिव्हल अंतर्गत रात्री 8 ते 11 दरम्यान विविध कार्यक्रम होत असतात.  तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी  महाआरती होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मेजवानी ग्रामीण भागातील नागरिकांना हाळम फेस्टिव्हलचे व संस्थापक माधव मुंडे यांच्या माध्यमातून मिळणार आहे.  हाळम फेस्टीव्हलच्या सर्व विविध कार्यक्रम व धार्मिक, आध्यात्मिक पर्वणीचा परळी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष गणेश दहिफळे, उपाध्यक्ष संतेाष शिवाजी गुट्टे, भागवत मुंडे, गणेश व्यंकटी गुट्टे, सहसचिव राहुल गुट्टे, कोषाध्यक्ष दिपक गुट्टे, जगन्नाथ मुंडे, प्रसिद्ध प्रमुख अनंत गुट्टे, आरती प्रमुख प्रल्हाद मुंडे, सजावट प्रमुख अजय गित्ते, राम गुट्टे मिरवणूक प्रमुख केशव बापू गुट्टे ,नागनाथ गुट्टे तर संघटक आकाश पेंटुळे, इकबाल शेख, विष्णु मुंडे, गोविंद दहिफळे, धनराज मुंडे, सोमनाथ गित्ते, केशव गुट्टे, प्रशांत मुंडे, हरिश्चंद्र मुंडे, महादेव गुट्टे, उमेश गुट्टे, ज्ञानेश्वर गुट्टे, माऊली गुट्टे, धनंजय गुट्टे, महेश दहिफळे यांनी केले आहे.

******************
आज निबंध स्पर्धेचे आयोजन

     तालुक्यातील मौजे हाळम फेस्टीवलच्या सार्वजनिक दुर्गादेवीच्या महोत्सवास दि.29 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला. नवरात्रोत्सव घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी हाळम येथे याठिकाणी उत्साहात दुर्गामाताची स्थापना करण्यात आली. दुसरा सोमवार, 30 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत गरजु रूग्णांनी लाभ घेतला. आज मंगळवार, दि.01 ऑक्टोंबर रोजी तिसऱ्या दिवशी  निंबध स्पर्धेचे आयोजन 5 वी 7 वी गट व 8 वी 10 वी गट  असाराहणार आहे. यामध्ये प्रथम येणार्‍यास 1511 रु. तर द्वित्तीय स्पर्धेकास 1111 बक्षीस ठेवण्यात आले आहे.  तरी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक माधव मुंडे यांनी केले आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांना कानमंत्रनियोजबध्द प्रचार यंत्रणा राबविण्यावर परळीतील कार्यशाळेत दिला भर

३ ऑक्टोबर रोजी भव्य शक्ती प्रदर्शनाने भरणार उमेदवारी अर्ज

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ३० ------ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी परळीची निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकण्यासाठी मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांना आज कानमंत्र दिला. नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना  कार्यशाळेत धडे दिले. दरम्यान, ना. पंकजाताई मुंडे येत्या ३ ऑक्टोबर रोजी  आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे मोठे शक्ती प्रदर्शन यावेळी होणार आहे.

   परळी मतदारसंघातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांची कार्यशाळा आज शहरातील अक्षता मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

  यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी मतदारांशी डोअर टू डोअर संपर्क, मतदानाची तयारी, प्रचाराचे नियोजन   आदींबाबत मार्गदर्शन केले. मी थेट बुथप्रमुखांच्या संपर्कात राहणार आहे, कुणाच्या धमक्यांना घाबरू नका, कसलीही काळजी करू नका, तुमची सुरक्षा करेल अशा शब्दांत आधार दिला. या निवडणुकीने आपल्याला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली आहे म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन केलेल्या कामांची सर्वाना माहिती देऊन मताधिक्य वाढविण्याची स्पर्धा करावी असे आवाहन त्यांनी केले.

विरोधक बिथरले ; त्यांचा स्वतःवरचा विश्वासही उडाला

ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. निवडणूकीत राष्ट्रवादीचे लोक कोणत्याही थराला जातील, सध्या ते बिथरले आहेत, त्यांचा स्वतःवरचा देखील विश्वास उडाला आहे. एकेक करत त्यांचे नेते आपल्याकडे येत आहेत, त्यांचा पक्ष जिल्हयातच नव्हे तर राज्यातही राहिला नाही, म्हणून ते भर सभेत स्वपक्षियांनांच धमक्या देत आहेत. ज्यांचा स्वतःच्या कार्यकर्त्यांवरच विश्वास नाही ते जनतेचा कसा विश्वास सार्थ करतील असा सवाल त्यांनी केला.

खोटे बोल पण रेटून बोल अशांपासुन सावध रहा - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

यावेळी मार्गदर्शन करताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, आपल्या कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घ्यावी. खोटे बोल पण रेटून बोल अशा लोकांपासून जनतेला सावध करावे. ना. पंकजाताई मुंडे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. आपण केलेली कामे जनतेला सांगा. विरोधक हे खोटे बोलणारे आहेत ना. पंकजाताई यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आपण जनतेला खरी परिस्थिती सांगा असे सांगून ना. पंकजाताई यांच्या विजयाचे आपण सर्वजण शिलेदार होऊ अशी साद कार्यकर्त्यांना घातली. ना. पंकजाताई म्हणजे चमत्कार अशी ओळख निर्माण झाली आहे. मास्टर स्ट्रोक मारण्याची कला आणि ताकद त्यांच्यात आहे आपण त्यांना बळ देण्याचे काम करू. आपल्याकडे निष्ठावंतांची फौज आहे तर त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना धमक्या द्याव्या लागत आहेत असा टोला हाणून ना. पंकजाताई मुंडे यांना ऐतिहासिक मताधिक्य मिळवण्यासाठी सर्वांनी प्राणपणाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीला भगदाड

यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मिरवट सेवा सोसायटीचे चेअरमन भरत इंगळे, कौडगाव साबळाचे माजी सरपंच उत्तमराव बोडखे, नागनाथ शिंदे यांनी  राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांसह तसेच संभाजी ब्रिगेड पिंपरीचे अध्यक्ष किशोर भोसले आदींनी भाजपात प्रवेश केला सर्वांचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले.

  भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख,  तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, विकासराव डुबे, श्रीहरी मुंडे, युवानेते श्रीराम मुंडे, जीवराज ढाकणे, बाबुराव मेनकुदळे, डॉ. शालिनीताई कराड,राजेश गीते, सुधाकर पौळ, भिमराव मुंडे, वैजनाथ जगतकर, शेख अब्दुल करीम, प्रा. बिभीषण फड, प्रा. पवन मुंडे, दत्तात्रय देशमुख, गंगाधर रोडे, बळीराम गडदे, वहाजोद्दीन मुल्ला, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि कांदे यांनी तर आभार प्रदर्शन उमेश खाडे यांनी केले.

विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या अंबाजोगाई भागाचा सर्वांगीण विकास करणार- धनंजय मुंडे


राडी गणात साधला मतदारांशी संवाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.30...... परळी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी ना परळीचा विकास केला की, परळी तालुक्याचा. या मतदार संघात येणार्‍या अंबाजोगाई भागालाही विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर ठेवले आहे. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची जवाबदारी आपण माझ्या खांद्यावर घेतली आहे. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर श्री.मुंडे यांनी रविवारी अंबाजोगाई सायगाव, सुगाव, भारज या गावातील मतदारांशी संवाद साधला तर सोमवारी वाघाळा चौक, अंबासाखर, वाघाळवाडी, अकोला या गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. कॉर्नर बैठका आणि प्रत्यक्ष भेटी-गाठींवर भर देताना त्यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या कल्पनाही मांडल्या. 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील, मतदार संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, राजपाल लोमटे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित चाचा लोमटे, प्रशांत जगताप, अजित गरड, विलास पाटील, सायगावचे फत्ताउला साहाब, असिम माफेजअली, हाशमी सर, सुंदर शिंदे, समीर पटेल, बंडू शिंदे, प्रसाद भगत, गणेश भगत, ऋषिकेश लोमटे, संदिप खाडे, अण्णासाहेब शेळके, कचरू मस्के, कल्याणराव भगत, महादेव वाघमारे, रामलिंग चव्हाण, गणपतराव राऊत, अरूण जगताप, ताराचंद शिंदे, श्रीमंत क्षीरसागर, मधुकर आगळे, रवि आगळे, शेवाळे, वसंतराव कदम, विनायक कदम, भगवानराव देशमुख, ईश्वर शिंदे, हनुमंत कदम, एकनाथ कातळे, कमलाकर कदम, अख्तर जहागीरदार, वहिद पठाण, संदिप कांबळे, श्रीमंत कांबळे, संदिप कांबळे, मेहराज शेख, आसद भाई, मनोज गंगणे आदींसह गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबाजोगाई तालुका सत्ताधार्‍यांमुळे विकासापासून लांब

मांजरा नदीवर आणखी बंधारे बांधून या भागात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याला आपली प्राथमिकता असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. या परिवर्तनाच्या लढाईत साथ द्या असे आवाहन केले. 

रूपसिंग तांडा येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.30...... परळी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज तालुक्यातील रूपसिंग तांडा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

जगमित्र संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, कृ. उ. बा. समितीचे संचालक माणिकभाऊ फड यांच्या उपस्थितीत प्रकाश भिमा पवार, अशोक प्रभु चव्हाण, भाऊराव पवार, जगन्नाथ पवार, लहू पवार, रूक्ष चव्हाण, अमोल पवार, सुभाष पवार, नामदेव चव्हाण, कृष्णा चव्हाण, मधूकर राठोड, धोंडीराम चव्हाण, रणजित राठोड, वसंत पवार, अमोल पवार, शंकर राठोड, मारोती चव्हाण, अरूण कोळंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार केला

सुगावचे भाजपाचे ज्ञानेश्वर शिंदे, युवा सेनेचे महेशअण्णा शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशअंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  दि.30...... तालुक्यातील सुगाव येथील भाजपा, युवासेनेला खिंडार पडली असून, भाजपाचे प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, युवा सेनेचे महेशअण्णा शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे सुगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाले आहे. 

सुगाव येथील गाव संपर्क दौर्‍यादरम्यान पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम झाला. यावेळी सागर शिंदे, बाबुराव शिंदे, गजानन शिंदे, पवन शिंदे, आकाश शिंदे, अनुराग शिंदे, अशिष शिंदे, हनुमान शिंदे, निलेश शिंदे, परशुराम शिंदे, अशोक शिंदे, शुभम अडसुळ, गोपाळ शिंदे, राहूल शिंदे, विकास पवार, रोहित शिंदे, राहूल पांडूरंग शिंदे, महादेव शिंदे, अजय शिंदे, गणेश शिंदे, महादेव टिळक, श्रीकांत शिंदे, सचिन टेकाळे, दत्ता टेकाळे, अनिकेत बाडे, मंगेश चव्हाण, सुशिल शिंदे, पवन पवार, श्रीकांत टेकाळे, शिवराम पवार, सुरज शिंदे, विठ्ठल शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.

धनंजय मुंडेंच्या पाठीशी ताकद उभी करा; भाच्च्याला आशीर्वाद द्या इंजेगावकरांना सौ.राजश्रीताई मुंडे यांचे आवाहन


; भाच्च्याला रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30...... नाथरा हे धनंजय मुंडे यांचे जन्मगाव असले तरी आत्याचे गाव म्हणून इंजेगाव या गावाशीही त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. इंजेगावकरांचे भाच्चे असलेले धनंजय मुंडे हे राज्यात परिवर्तन करण्यासाठी निघाले आहेत. परिवर्तनाची त्यांची ही लढाई परळी पासून सुरूवात झाली असून, तुमच्या भाच्च्याला आशीर्वाद देवून ताकद उभी करा, असे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी केले.

परळी विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी सौ.राजश्रीताई मुंडे यांनी आज इंजेगाव येथील मतदारांशी संवाद साधला. मी इथे तुम्हाला मतदार म्हणून बोलण्यासाठी आलेली नाही, तर सून म्हणून तुमच्या भाच्च्याचे काम सांगण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आले आहे. स्व.पंडित अण्णांचे आणि धनंजय मुंडे यांचे इंजेगाव या गावावर नाथर्‍याइतकेच जीवापाड प्रेम आहे. या गावाशी कौटुंबिक नाते आहे, म्हणूनच तुमच्या कुटुंबातील कर्तृत्ववान भाच्च्याला आशीर्वाद देण्याची ही वेळ आली असून, त्यांच्या पाठीशी आपली मतदान रूपी ताकद उभी करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती सुर्यभान मुंडे, पं.स.सदस्या मिराताई तिडके, सौ.मनिषाताई मुंडे, केंद्रे ताई, वसंत तिडके, सुरेश मुंडे, मारोती कराड, दिलीप कराड, लालू कराड, बालु क्षीरसागर, अनंत लटपटे, मुक्ताराम गवळी, राजाभाऊ कराड, ज्ञानोबा कराड, सुखदेव कराड, हरिभाऊ कराड, महादेव कराड, वैभव कराड आदी उपस्थित होते.

नवसाला पावणारी लोढाई माता
प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन 

आसोला ता रिसोड येथुन जवळ असलेल्या लोढाई माता संस्थान एक जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला एकदिवसाची भव्य यात्रा भरते. या यात्रेमध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे जवळपास पंधरा ते वीस गावातील मुली सासरवरुन नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी येतात. दररोज सकाळी पाच वाजता शेकडो भाविक भक्त लोढाई मातेच्या आरती साठी गडावर उपश्यित राहतात. त्याठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. दरवर्षी यात्रेच्या दिवसी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे सहकार्य लाभते.याहीवर्षी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन लोढाई माता संस्थान चे अध्यक्ष श्री भानुदास रामकिसन पाचरणे व विश्वस्त सर्वश्री श्री शिवाजी पाचरणे, श्री मारोतराव कोकाटे, श्री दत्ता पाटील कोकाटे, श्री अभिमान पाचरणे, श्री बालाजी पाचरणे,श्री विठ्ठलराव कोकाटे, श्री भानुदासराव कोकाटे, श्री उद्धवराव मुटकुळे, श्री दत्तराव गरकळ व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
9960292121

'गेवराई मतदार संघ एक माॅडेल' करण्यासाठी प्रयत्न - आ. पवार


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३० _ मतदार संघातील जनतेने मला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आमदार केले, तेव्हापासून प्रत्येक गावाचा शक्य तितका विकास करण्याचा प्रयत्न करून ग्रामीण भागातील दळण वळणांचा मार्ग सुकर केला आहे. अनेक गावांना जलसिंचन व्हावे म्हणून बंधारे बाधण्यात आले आहे तसेच   राक्षसभुवन, केकंत पागंरी, राजापूर येथील 33 केव्ही केद्र उभारून लाईटचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे त्यामुळे भविष्यात गेवराई विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात माॅडेल म्हणून निर्माण करण्यासाठी जनतेने मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवहान आ. लक्ष्मणराव पवार यांनी आयोजित बैठकी दरम्यान बोलताना केले आहे.
           गेवराई विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील मादळमोही, गढी, जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवार, दि. ३० रोजी आयोजित केली होती, यावेळी जि.प.सदस्य प्रल्हाद माने, पं.स.सदस्य जगन आडागळे, जे.डी.शहा, महेश दाभाडे, सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर आदि उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेवराई मतदार संघावर यापुर्वी दोन्ही पंडितांनी सत्तेत होते, त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा वाळवंट झाला होता, पण स.न. २०१४ ला केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आले होते. जनतेच्या आशिर्वादाने आमदार आहे, त्यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघात विकास कामे करून गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केला आहे, त्यामुळे गेवराई मतदार संघात आज आपण केलेला विकास जनतेच्या समोर आहे. आता होऊ घातलेल्या विधानसभा  निवडणुकीत आपण मला आशिर्वाद द्यावा असे आवाहन आ. लक्ष्मणराव पवार यांनी बैठकी दरम्यान केले आहे.
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

सेनगाव कृषी ऊत्पन्न बाजार समितीत नव्या सोयाबिनला प्रति क्विंटल 3 हजार 838 रुपये भाव(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव/प्रतिनीधी
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी ऊत्पन्न बाजार समितीत नविन सोयाबिनची आवक चालु झाली असुन आज दि.30 सप्टेंबर सोमवार रोजी नव्या सोयाबिनला प्रतिक्विंटल 3 हजार 838 रुपये भाव मिळाल्याने शेतक-यातुन समाधन व्यक्त होत आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सोयाबिन ऊत्पन्नात वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.गेल्यावर्षी अल्प पाऊसामुळे सोयाबिन व इतर पिकांचे ऊत्पन्न कमी झाले होते व नविन सोयाबिनला 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता यामध्ये शेतक-यांच्या लागवडीचा खर्च ही निघाला नाही.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता परंतु यावर्षी निसर्गाने शेतक-यांना साथ दिली असल्याने पाऊस चांगला झाला व सोयाबिन पिकाचे ऊत्पन्न देखील वाढले.आज दि.30 सप्टेंबर सोमवार रोजी बाजार समितीत शेतक-यांनी आपले नविन सोयाबिन विक्रीसाठी आनले होते.यामध्ये शेतकरी विश्वनाथ शिंदे रा.सापटगाव (12 पोते),माणिक राठोड रा.खडकी (16 पोते)व प्रताप शिंदे रा.वटकळी (10 पोते) या शेतक-यांच्या सोयाबिनला प्रतिक्विंटल 3 हजार 838 रुपये भाव पहिल्यांदाच मिळाल्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.पाऊस यावर्षी सारखा चांगला राहील्यास व सोयाबिनला असाच भाव राहील्यास शेतक-यांना कर्जमुक्तीची गरजच राहणार नाही असे ही उपस्थित शेतक-यातुन बोलल्या जात होते.नविन सोयाबिन विक्रीस आनणा-या सर्व शेतक-यांचा सत्कार श्रीफळ व रुमाल देऊन करण्यात आला.यावेली बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ,व्यापारी अशोशिएसनचे अध्यक्ष बालमुकुंदजी जेथलीया,उपाध्यक्ष संजय देशमुख,सचिव शंकर सोनटक्के,रामनिवास तोष्णीवाल,प्रकाश बिडकर,शिवाजी देशमुख,राहुल तोष्णीवाल,विजय तोष्णीवाल आदी व्यापा-यासह बाजार समितीचे कर्मचारी,शिवाजी तिडके,मुकेश देशमुख,नरवाडे,बुळे,पवार व शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने ९६- परभणी

परभणी, दि. ३० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या अनुषंगाने  ९६- परभणी  मतदारसंघासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्‍या पाच उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे अ‍ॅड. अफजल बेग सहाब (अपक्ष), अब्‍दुल सत्‍तार अब्‍दुल अजीज शेख (इनामदार) (अपक्ष),गोविंद (भैय्या)रामराव देशमुख पेडगावकर (अपक्ष्‍ा),  कौसडीकर निहाल अहेमद कौसडीकर खाजामियॉ (अपक्ष), शेख शकुर शेख ईस्‍माईल (अपक्ष) तसेच ९७-गंगाखेड या मतदार संघासाठी आज सिताराम चिमाजी घनदाट (अपक्ष) या उमेदवारांने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. असे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

जिंतूरात वंचित आघाडी कडून मनोहर वाकळे यांच्या उमेदवारी ने निवडणुक अटीतटीची होणारआता भांबळे बोर्डीकर वाकळे तिरंगी लढत 

जिंतूर

जिंतूर सेलू विधानसभा विधानसभा मतदारसंघात आता तिरंग लढत रंगणार आहे 
वंचित आघाडीने अधिकृत मनोहर वाकळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे व राष्ट्रवादी कडून विद्यमान आमदार विजय भाबळे यांचे पण नाव फायनल आहे
आता मात्र मेघना बोर्डीकर कोणत्या पक्षाचे तिकीट या अंटाट्या वर निवडणूक रंगणार आहे 
एकंदर तिरंगी होणार हे मात्र निश्चित व ती पण अटीतटीची

अभिनव विद्यालयात शिक्षक-पालक गुणवत्ता चर्चासत्र संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : -
      ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी येथे वर्ग पाचवी , सहावी व सातवी सेमी या वर्गातील पालकांना शाळेत आमंत्रित करून संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ जबदे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता विकास चर्चासत्र संपन्न झाला. या चर्चासत्रामध्ये प्रथम घटक चाचणीमध्ये मिळालेले गुण तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या यावर शिक्षक व पालक यामध्ये चर्चासत्र ठेवण्यात आले होते यानुसार आपल्या पाल्याला किती गुण मिळाले व त्याची अभ्यासाची कमजोरी काय आहे हे लक्षात येण्यासाठी व पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी या चर्चासत्रामध्ये सर्व विषय आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास यावर चर्चा झाली. योग्य उपाययोजना करण्यासाठी पालक व शिक्षक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल हा मुख्य विषय होता या चर्चासत्राला पाचवी, सहावी व सातवी सेमी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच विषय शिक्षकांची चर्चा करून आपापली मते मांडली या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.

शिवपुरी (म.प्र.) हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; परळी येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रपतींना निवेदन

 वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  शिवपुरी (मध्यप्रदेश राज्य) येथील बाल्मीकी जातीतील याच अल्पवयीन मुलीवर गावातील आरोपी गाव गुंड हाकीम यादव, रामेश्‍वर यादव या दोघांनी बलात्कार केला व बचावासाठी आलेल्या भावासही या आरोपींनी काठयांनी बेदम मारहाण करून हत्या केली. सदरील घटना दडपण्यासाठी उच्चवर्णीयांनी सार्वजनिक ठिकाणी शौच केल्याचे कारण पुढे करून जमावाने (मॉब लिचींग) हत्या केल्याच्या निषेधार्थ परळी येथे राष्ट्रपतींच्या नावे तहसिलदार,परळी-वै यांच्या मार्फत दि.30 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.  या निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे , पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल चिंडालीया, अ‍ॅड. कपील चिंडालीया, रिपाइं एकतावादीचे शैलेश पोटभरे, बसपा जिल्हाध्यक्ष डॉ. अनंत गायकवाड, पत्रकार प्रेमनाथ कदम, नवनाथ दाणे, बापु गायकवाड, प्रा. ब्रम्हानंद कांबळे, प्रशांत रोडे, अमोल रोडे, कृष्णा शिंदे, राज जगतकर, धम्मा जगरतकर, पत्रकार अभिमान  मस्कें आदींनी स्वाक्षर्‍या केल्या. 
सविस्त माहिती अशी की, शिवपुरी (मध्यप्रदेश राज्य) येथील बाल्मीकी जातीतील (एस.सी.) दि.25/09/2019 रोजी सकाळी शौचास गेलेल्या रोशनी बाल्मीकी (वय-12 वर्षे) हिच्यावर याच गावातील आरोपी हाकीम यादव, रामेश्‍वर यादव या दोघांनी बलात्कार केला व बचावासाठी आलेल्या अविनाश बाल्मीकी (वय-10 वर्षे) या दोघांना आरोपींनी काठयांनी बेदम मारहाण करून हत्या केली.  या मॉब लिचींगच्या घटना केवळ मुस्लीम, आदिवासी व मोठया प्रमाणात अनुसुचित जातींच्या लोकांवर होत आहेत. हे सामाजिक विषमतेच्या विषारी, मनुवादी, धर्मवादी व जातीयवादी मानसिकतेतून केलेल्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच, या घटनेतील सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दयावी अशी निवेदनाद्वारे निषेध करून मागणी केली आहे.

* चौकट*
पिडीत कुटूंबास पोलीसांनी संरक्षण देऊन 50 लाख रूपयांचे अर्थ सहाय्य करावे. तसेच भविष्यात अमानवीय व भेदवाभावतून घटना होऊ नये यासाठी सरकारने त्वरीत उपाययोजना कराव्यात असेही पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल चिंडालीया यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

नाभिक संघटना कडून सत्कार
सत्कार मूर्ती 
बाबासाहेब वाघचौरे, जयेश वाघचौरे, अनिल वाघचौरे 

सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील नाभिक समाज संघटना कडुन राहुरी तालुका शिवसेना प्रमुख मा.जयेश सुरेशचंद्र वाघचौरे  व जागतिक संसदीय संघाचे सदस्य  बाबासाहेब यादवराव वाघचौरे व राहुरी तालुका नाभिक संघटना अध्यक्ष अनिल चांगदेव वाघचौरे  यांच्या वेगवेगळ्या पदी निवड झाल्याबद्दल सात्रळ पंचक्रोशीतील नाभिक संघटनाच्या वतीने सात्रळ येथील संत सेना महाराज व मारूती मंदिरमध्ये सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. रमेश आण्णा पन्हाळे यांनीही मनोगत व्यक्त करण्यात आले.जेष्ठ सेवानिवृत्त पोपटराव वाघचौरे यांनीही सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमिन भाई शेख,संदेश लोढे,प्रशांत दिघे,खादिग्रामोद्योगचे चेअरमन रमेश आण्णा पन्हाळे,माजी अध्यक्ष विजय वाघचौरे, पत्रकार समर्थ वाघचौरे, संजय वाघचौरे,सुनिल वाघचौरे, गोकुळ वाघचौरे, अमित वाघचौरे, विजय कोरडे, श्रीराम वाघचौरे,सोमनाथ सातपुते,अक्षय वाघचौरे, जनार्दन वाघचौरे, बबलु वाघचौरे, केशवराव वाघचौरे, पाराजी वाघचौरे, गोकुळ वाघचौरे,पांडुरंग बोरुडे,सोमेश वाघचौरे,योगेश वाघचौरे,गणेश वाघचौरे,आदि उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वाघचौरे तर आभार पोपटराव वाघचौरे यांनी मानले.