तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 28 September 2019

परळीत 12 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या करा; मुंडेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, असेही /निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धुमाकूळ सुरू असताना परळी विधानसभा मतदार संघात मुंडे विरुद्ध मुंडे अशी थेट बहिण विरुद्ध भाऊ लढत होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका शांततेत व पारदर्शक पार करायच्या असतील तर परळी येथे मागील 10 ते 12 वर्षांपासून ठाण मांडून बसलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, अशी मागणी श्रम व रोजगार नाशिक विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी दि.26.09.2019 रोजी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

  याबाबत दिलेल्या निवेदनात वसंत मुंडे यांनी म्हणटले आहे की, परळी तालुका व शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. येणार्‍या निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, पोलीस अधिकारींची जिल्ह्याबाहेर तात्काळ बदली करण्यात यावी, असेही निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले आहे. या निवेदनाची दखल घेऊन निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा पोलिस कर्मचारी यांच्या बदली करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे मुंडे यांनी केली आहे.

   बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील व अंबाजोगाई तालुक्यातील
परळी विधानसभा मतदार (233) संघ येथील १० ते १२ वर्षापासून पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे कर्मचारी ठाणमांडुन राजकीय आश्रयमुळे बसले आहेत. पोलीसांच्या प्रशासकीय बदल्या नियमानुसार
केल्या जात नाहीत, राजकीय आश्रय असल्यामुळे व स्थानिक कर्मचारी पोलीस दवाव वरिष्ठांवर टाकतात. त्यामुळे  परळी शहरात अवैध धंदे, गुन्हेगारी, अवैध वाहतूक, मटके, दारुचे अड्डे, पत्त्याचा जुगार, गुटखा विक्री चोरी, चरस, गांजा, अफु. गुंडागर्दी वाढलेली आहे. शासनाकडे अनेक वेळा तक्रार देऊन ही बीड जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी आतापर्यंत एकाही कर्मचारी यांची चौकशी करून कार्यवाही केली जात नाही. तसेच पोलीसांच्या बदल्यांची कारवाई न झाल्यास  विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे  १० ते १२ वर्षापासून नियमबाहय ठाण मांडून बसलेले पोलीसांच्या तात्काळ बदल्याचे आदेश मा. पोलीस महासंचालक, मुंबई यांना निवडणूक आयोगाने  देण्यात यावेत, अशी मागणी श्रम व रोजगार विभाग नाशिकचे चेअरमन वसंत मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment