तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

खोडवा सावरगाव येथे 2 सप्टेंबर पासुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
तालुक्यातील मौजे खोडवा सावरगाव येथील हनुमान मंदिरात दि.02 सप्टेंबर पासुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ होत असुन ह.भ.प.गणेशानंद महाराज गुट्टे हे कथा प्रवक्ते आहेत. दि.10 सप्टेंबर पर्यंन्त चालणार्‍या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खोडवा सावरगाव येथील श्री.गणेशोत्सवानिमित्त आयोजित या ज्ञानयज्ञ सोहळ्याचे हे 30 वे वर्ष असुन यानिमित्त दि.02 ते 9 सप्टेंबर या कालावधीत श्री भागवत कथेतील ग्रंथ मंगल, परिक्षीत शाप, धु्रवकथा, कृष्णजन्म, गोवर्धन कथा, रुक्मिणी स्वयंवर, सुदाम चरित्र व परिस्थिती मोक्ष कथा आदी प्रसंग वर्णन करण्यात येणार आहेत. तर दि.10 रोजी ह.भ.प.गणेशानंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने कथा सोहळ्याची सांगता होणार असुन यानंतर गणपती विसर्जन दि.12 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन खोडवा सावरगाव येथील ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:

Post a comment