तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

घर, पाणी, गॅस कनेक्शनसह 2022 पर्यंत


जनसामान्यांना सर्व मूलभूत सुविधा देणार
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
औरंगाबाद, दिनांक 7 (जिमाका) – देशातील सर्व जनतेला मूलभूत सोयी सुविधांयुक्त जीवन देण्यासाठी शासन कटीबद्ध असून 2022 पर्यंत प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पक्के घर, घरामध्ये पाणी, गॅस कनेक्शन यासह इतर सर्व मूलभूत सोयी सुविधा पोहचवल्या जाणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले. 
 प्रधानमंत्री यांच्या हस्ते आयोजित औरंगाबाद इंडस्ट्रियल आऊशिप लिमिटेड (शासनाचा अंगीकृत उपक्रम) ऑरिक शेंद्रा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व ऑरिक हॉलचे उद्घाटन तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्वयं सहाय्यता गटातील 1 लक्ष महिलांचा राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याचे आयोजन एम.आय.डी.सी. शेंद्रा, औरंगाबाद येथे करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री अतुल सावे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रीमती ज्योती ठाकरे, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव असिम गुप्ता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, शासनामार्फत देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी विविध लोकोपयुक्त योजना राबवल्या जात असून जनसामान्यांना मुलभुत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. महिलांना पाण्याचा प्रश्न अनेक काळापासून सातत्याने भेडसावत आह. पाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतोय तो दूर करण्यासाठी जल जीवन मिशनची सुरवात करण्यात आली असून यामध्ये पाण्याची बचत, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यासाठी साडेतीन लाख करोड रू. खर्च करण्यात येणार आहे. राज्यात, मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पाणी प्रश्नावर चांगले काम सुरू असून पहिला वॉटरग्रीड प्रकल्प मराठवाड्यात होत आहे. हे निश्चितच प्रशंसनीय आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढेल. शेतीसह इतर आवश्यक कामांसाठी पाणी उपलब्ध होईल. शेतीला किफायतशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम, 60 वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन, पशुधन स्वास्थासाठी लसीकरण मोहीम अशा विविध योजना शासन राबवत आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला पक्के घर देणार असून 1 करोड 80 लाख घरे बनले आहेत. होम लोनवर दिड लाखाची सूट दिली असून रेरा कायद्याने घर घेण्याच्या प्रक्रियेत विश्वासार्हता आणली असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. 
ग्रामीण भारत सशक्त झाला तर देश खऱ्या अर्थाने सशक्त सबल बनेल. देशातील महिलावर्ग हा प्रगतीचा महत्त्वपूर्ण प्रभावशाली घटक आहे. त्यांना सक्षम बनण्याची संधी दिली तर या सक्षम महिला देशालाही सक्षम संपन्न करण्यात भरीव योगदान देतील. या दृष्टीने शासन महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आत्मनिर्भरतेची मोठी संधी देत आहे. ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता मिळाली आहे. देशाच्या आर्थिक विकासात हे महत्त्वाचे पाऊल आहे. शून्य टक्के व्याजदराने महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या सबसिडीमध्येही वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या गतिमान प्रगतीसाठी महिलांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेव्दारा धूरमुक्त आरोग्यदायी जगण्यासाठी शासन गॅस कनेक्शन देत आहे. या योजनेतील उद्दिष्टाची पुर्तता सात महिने आधी आपण करत आहोत आणि 8 करोड गॅस कनेक्शन आज इथे औरंगाबाद मध्ये महिला मेळाव्यात होत आहे. ही आनंदाची बाब आहे. 8 करोड उज्ज्वला गॅस कनेक्शपैकी महाराष्ट्रात 34 लाख कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र शासनाने सत्ते आल्यावर 100 दिवसाच्या आत 5 करोड गॅस कनेक्शन पूर्ण केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवीन 10 हजार एलपीजी गॅस वितरक नेमण्यात आले असून ग्रामीण भागात त्यामुळे घरोघरी सहजतेने गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे पाईप लाइनव्दारे गॅस नेटवर्कचा विस्तार करण्याचेही काम सुरू आहे. देशात एकही कुटुंब एलपीजी गॅस सिलेंडर पासून वंचित राहू नये यासाठी 5 किलोचा छोट्या सिलेंडरला प्रोत्साहन दिल्या जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. 
बच

No comments:

Post a Comment